Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » नशीराबादजवळ भीषण अपघातात चार जण जागीच ठार
    क्राईम

    नशीराबादजवळ भीषण अपघातात चार जण जागीच ठार

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJune 29, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    दोन्ही मालवाहू वाहन चक्काचूर झाल्या, तीन जण उड्डाणपुलावरून थेट खाली कोसळले

    जळगाव ; फैजपूर येथील बाजारासाठी बोलेरो पीकअप वाहनातून बकर्‍या घेऊन जाणार्‍या वाहनाला भरधाव वेगाने रॉंग साईडने येणार्‍या ट्रकने उडविले. यानंतर हाच ट्रक आणखी एक ट्रकवर धडकून या भिषण अपघातात यात चार जण ठार झाले आहे. बुधवारी पहाटे साडेसात वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील नशिराबाद ते साकेगाव दरम्यान सिमेंट फॅक्टरीजवळ रेल्वे उड्डाणपुलावर हा भिषण अपघात झाला.

    जुनेद सलीम खाटीक (वय-१८) रा आझाद चौक,भडगाव , अकील गुलाब खाटीक (वय-४२) रा.फैजपूर हल्ली मुक्काम सुप्रीम कॉलनी जळगाव, व नईम अब्दुल रहीम खाटीक (वय-५५) बिलाल चौक जळगाव, फारुख मजिद खाटीक ( वय 40 रा. भडगाव आझाद चौक) अशी मयताची नावे आहेत.

    जळगावकडून बुधवारी सकाळी बकऱ्या घेऊन मालवाहू पीकअप क्रमांक एमएच.४३.एडी.१०५१ व एमएच.१९.बीबी.००५० हे भुसावळच्या दिशेने फैजपूर येथील बाजारासाठी जात होते. यादरम्यान नशीराबाद ते साकेगाव दरम्यान महामार्गावर सिमेंट फॅक्टरी ते डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयजवळ रेल्वे उड्डाणपुलावर वळणावर समोरून येत असलेल्या ट्रक क्रमांक एमपी.०९.एजी.९५२१ ने दोन्ही वाहनांना जोरदार धडक दिली. या तिहेरी वाहनांच्या भिषण अपघातात चौघे जागीच ठार झाले.

    अपघात इतका भयंकर होता की चौघांचा जागीच मृत्यू झाला. ट्रकच्या धडकेत तीन जण उड्डाणपुलावरून थेट खाली कोसळले. दोन्ही मालवाहू चक्काचूर झाल्या असून एक मालवाहूची ट्रॉली ट्रकला चिकटली होती. मयत आणि जखमींना तात्काळ डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. जखमींवर डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. महामार्गावर वाहतूकीच्या लाबच लाब रांगा लागल्या होत्या.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    “मी दादागिरी करणारच” वक्तव्याने पेटला वाद; सपोनि चौधरी नियंत्रण कक्षात

    February 20, 2026

    चौघांनी केली तरुणावर धारदार शस्त्र व लोखंडी रॉडने मारहाण !

    February 20, 2026

    ३२ वर्षीय तरुणाने घेतली तापी नदी पात्रात उडी !

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.