Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » चाळीसगाव येथे कौटुंबिक वाद सोडवण्यासाठी 4 हजाराची लाच घेणाऱ्या सहाय्यक फौजदारासह पोलिस कर्मचाऱ्याला अटक
    क्राईम

    चाळीसगाव येथे कौटुंबिक वाद सोडवण्यासाठी 4 हजाराची लाच घेणाऱ्या सहाय्यक फौजदारासह पोलिस कर्मचाऱ्याला अटक

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJune 28, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: पती-पत्नीच्या कौटुंबिक वादात दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी 4 हजार रूपयांची लाच स्वीकारतांना येथील सहायक फौजदारासह पोलीस कर्मचार्‍याला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने मंगळवारी 28 जून रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास रंगेहात पकडल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत आला आहे

    या संदर्भात वृत्त असे की, एका ५५ वर्षाच्या व्यक्तीच्या मुलीला विवाहानंतर सासरी त्रास होत होता. यामुळे तिने सासरच्या मंडळीच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. या खटल्यात आम्ही मदत करून यासाठी तिच्या वडिलांकडे सहायक फौजदार अनिल रामचंद्र अहिरे आणि पोलीस नाईक शैलेश आत्माराम पाटील यांनी 5 हजार रूपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर 4 हजार रूपये देण्याचे ठरले. तर या प्रकरणी संबंधीत व्यक्तीने अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार केली. यानुसार एसीबीच्या पथकाने आज सापळा रचला.

    या सापळ्यात अनिल रामचंद्र अहीरे, वय-५२, सहा.फौजदार, नेम-चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन वर्ग-३ रा.वैष्णवी पार्क, चाळीसगांव. ता.चाळीसगाव आणि शैलेष आत्माराम पाटील, वय-३८,पोलीस नाईक, नेम-चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन वर्ग-३ यांना लाच घेतांना अटक करण्यात आली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    “मी दादागिरी करणारच” वक्तव्याने पेटला वाद; सपोनि चौधरी नियंत्रण कक्षात

    February 20, 2026

    चौघांनी केली तरुणावर धारदार शस्त्र व लोखंडी रॉडने मारहाण !

    February 20, 2026

    ३२ वर्षीय तरुणाने घेतली तापी नदी पात्रात उडी !

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.