Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » हृदयद्रावक : महिला डॉक्टरने संपविले आयुष्य : सुसाईट नोटमुळे मोठी खळबळ !
    क्राईम

    हृदयद्रावक : महिला डॉक्टरने संपविले आयुष्य : सुसाईट नोटमुळे मोठी खळबळ !

    editor deskBy editor deskOctober 24, 2025No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सातारा : वृत्तसंस्था

    राज्यातील सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण वैद्यकीय क्षेत्र हादरले आहे. येथील कार्यरत महिला डॉक्टर डॉ. संपदा मुंडे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना समजताच रुग्णालयातील सहकारी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा पसरली. आपल्या कर्तव्यनिष्ठ आणि रुग्णसेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या या डॉक्टरने असे टोकाचे पाऊल उचलल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. स्थानिकांपासून वैद्यकीय संघटनांपर्यंत सर्व स्तरांवर या घटनेबाबत दुःख आणि संताप व्यक्त केला जात आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून डॉ.मुंडे या पोलिस आणि आरोग्य विभागातील प्रशासकीय वादात अडकल्या होत्या. एका वैद्यकीय तपासणी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर चौकशी सुरू होती. या कालावधीत त्यांना प्रचंड मानसिक ताणाचा सामना करावा लागत होता, अशी माहिती सहकारी कर्मचाऱ्यांनी दिली आहे. संबंधित चौकशी दरम्यान त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर करून आपल्यावर अन्याय होत असल्याची तक्रार केली होती.

    सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टर प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. मृत डॉक्टर डॉ. संपदा मुंडे यांच्या हातावर थेट सुसाईड नोट आढळली असून, त्यात त्यांनी दोन पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. या सुसाईड नोटमध्ये डॉक्टर मुंडे यांनी स्पष्टपणे लिहिले आहे की, पोलिस निरीक्षक गोपाल बदने यांनी माझ्यावर चार वेळा बलात्कार केला, तर पोलीस प्रशांत बनकर यांनी मला सतत मानसिक त्रास दिला. या धक्कादायक खुलाशामुळे सातारा जिल्ह्यात आणि संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येपूर्वी डॉक्टर काही काळ पोलिस आणि आरोग्य विभागातील वादात अडकल्या होत्या. एका वैद्यकीय तपासणीसंदर्भात पोलिसांशी झालेल्या वादानंतर त्यांच्या विरोधात अंतर्गत चौकशी सुरू होती. त्याच दरम्यान त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

    दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे. घटनेची माहिती मिळताच उच्च पदस्थ पोलिस अधिकारी फलटण येथे दाखल झाले असून, सुसाईड नोटच्या हस्ताक्षराची तपासणी, तसेच डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराच्या आरोपांची पडताळणी सुरू आहे. या प्रकरणात आरोपी पोलिसांवर बलात्कार व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. वैद्यकीय संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत, दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. डॉ. मुंडे यांच्या मृत्यूमुळे वैद्यकीय क्षेत्रात संतापाची लाट असून, महिला डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

    दरम्यान, डॉ. मुंडे यांनी यापूर्वीही या प्रकरणी तक्रार केल्याचे समजते. त्यात माझ्यावर अन्याय होत आहे, मला आत्महत्या करावी लागेल, असे त्यांनी त्या पत्रात नमूद केले होते. मात्र, त्यांच्या या पत्राची दखल घेतली गेली नसल्याचे सूत्रांकडून समजते. त्यामुळे अखेरीस त्यांनी निराशेतून आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी प्राथमिक शक्यता तपासात व्यक्त केली जात आहे.

    या प्रकरणाची नोंद फलटण पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पोलिस या घटनेचा सर्वांगीण तपास करत आहेत. आत्महत्येच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याचा सखोल तपास सुरू आहे. या बाबत तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, चौकशीतील दबाव, प्रशासकीय ताण किंवा वैयक्तिक कारण, हे तपासानंतर स्पष्ट होईल. या घटनेनंतर आरोग्य विभागातही हालचाली सुरू झाल्या असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली आहे. सहकारी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मृत्यूबाबत सखोल चौकशीची मागणी केली आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सोनसाखळी चोरीचा उलगडा : रावेर गुन्हे शोध पथकाच्या सापळ्यात दोन सराईत चोर !

    December 4, 2025

    संतापजनक : सहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार : शाळेच्या सीसीटीव्हीट घटना कैद !

    December 4, 2025

    मुख्य मालकांवर कारवाई का नाही? ; अंबादास दानवेंनी सरकारला धरले धारेवार !

    December 4, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.