यावल : प्रातिनिधी
तालुक्यातील दहिगाव येथील २१ वर्षीय तरुणाच्या हत्येप्रकरणी सखोल तपास करताना यावल पोलिसांनी एका १६ वर्षीय अल्पवयीन विधी संघर्षीत बालिकेसही ताब्यात घेतले आहे. या मुलीचे प्रेम प्रकरण उघडकीस आणले व तिच्या पालकांना माहिती दिली. या रागातून तिने तरूणांना हत्या करण्याकरीता चिथावणी दिल्याचे समोर आले आहे. या बालिकेस विशेष बाल न्याय मंडळ जळगाव येथे हजर केले असता तिला बाल अधिरक्षा कक्षात ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. तर या गुन्ह्यात तीन तरूण सध्या न्यायलयीन कोठडी आहेत.
सविस्तर वृत्त असे कि, दहिगाव ता. यावल या गावातील सुरेश आबा नगरातील रहिवासी इम्रान युनुस पटेल (वय २१, मुळ रहिवासी हनुमंतखेडा ता.धरणगाव) या तरूणाची दि. २९ ऑगस्ट रोजी रात्री ज्ञानेश्वर गजानन पाटील (वय १९) व गजानन रवींद्र कोळी (वय १९ दोन्ही रा. सुरेश आबा नगर, दहिगाव) या तरुणांनी कोयत्याने वार करीत हत्या केली होती. व ते दोघे पोलिसांना शरण आले होते. तसेच या गुन्ह्यात त्यांच्या सोबत यावल शहरातील सुतार वाडा भागातील रहिवासी तुषार राजेश लोखंडे उर्फ जन्नत (वय १९) हा देखील असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.
या गुन्ह्यात नागपूर येथील एका १७वर्षीय अल्पवयीन मुलीकडे देखील पोलिसांना सखोल तपास केला होता. व सखोल तपास अंती १६ वर्षीय अल्पवयीन विधी संघर्षीत बालिके संदर्भात अनेक पुरावे पोलिसांना मिळाले. तेव्हा तिलाही देखील ताब्यात घेतले. या बालिकेचे प्रेम प्रकरण मृत तरुणाने तिच्या पालकांना सांगून उघडकीस आणले होते. याचा राग बालिकेच्या मनात होता म्हणून तिने चिथावणी दिल्याने तरुणांनी हा खून केल्याचं समोर आले आहे. या बालिकेस विशेष बाल न्याय मंडळ जळगाव येथे हजर केले असता तिला बाल अधिरक्षा कक्षात ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. तर या गुन्ह्यातील तिघे न्यायलयीन कोठडी आहे. पुढील तपास पोलिस निरिक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक अनिल महाजन करीत आहे.


