Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मदत करण्याच्या बहाण्याने वृद्धाची ४८ हजारात फसवणूक !
    क्राईम

    मदत करण्याच्या बहाण्याने वृद्धाची ४८ हजारात फसवणूक !

    editor deskBy editor deskJuly 20, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    पैसे काढण्यासाठी मदत करण्याचा बहाणा करून एका जणाने एटीएम कार्ड बदलवून सुधाकर पंडितराव सुरसे (६४, रा. शाहूनगर) यांची ४८ हजार ३०० रुपयांमध्ये फसवणूक केली. हा प्रकार १२ जुलै रोजी गणपती मंदिरासमोरील एटीएममध्ये घडला. या प्रकरणी १८ जुलै रोजी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    नूतन मराठा महाविद्यालयातून निवृत्त झालेले सुधाकर सुरसे हे १२ जुलै रोजी त्यांच्या पत्नीचे एटीएम कार्ड घेऊन चित्रा चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील गणपती मंदिरासमोरील एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यांनी पैसे काढण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण केली; मात्र पैसे निघाले नाही. त्यामुळे तेथे बाजूला उभ्या असलेल्या एका तरुणाने शेजारील मशीनमधून पैसे काढा, असे सांगितले. मात्र त्या मशीनमधून पैसे काढता येत नसल्याचे सेवानिवृत्ताने सांगितले असता तरुणाने मदत करण्याची तयारी दाखविली. त्यासाठी त्याने निवृत्ताजवळील कार्ड घेऊन ते मशीनमध्ये टाकले, मात्र पैसे निघत नसल्याचे सांगत त्याने हातचलाखीने कार्ड बदलविले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    रस्त्याच्या कडेला रक्तबंबाळ मृतदेह; तपासात उलगडले मृत्यूचे गूढ

    June 23, 2026

    “पैसे द्या, तरच मिळेल अनुदान”; शेतकऱ्याला लाचेची मागणी महागात ; जामनेरात खळबळ !

    June 23, 2026

    पाळधीजवळ मृत्यूचा तांडव; समोरासमोरच्या धडकेत तिघांचा जागीच अंत!

    June 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.