Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात सूरा घेवून दहशत माजवितांना जेरबंद !
    क्राईम

    जळगावात सूरा घेवून दहशत माजवितांना जेरबंद !

    editor deskBy editor deskJuly 9, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलेला सराईत गुन्हेगार पवन उर्फ बदया दिलीप बावीस्कर (वय २५) याला सोमवारी दुपारी तुकारामवाडी परिसरात सूरा घेवून दहशत माजवितांना जेरबंद केले. त्याच्याविरुद्ध कुठलीही परवानगी न घेता जिल्ह्यात प्रवेश करून तो वावरत असल्याचे समोर आले असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, शहरातील तुकाराम वाडी परिसरातील पवन उर्फ बदया दिलीप बावीस्कर याला दि. १८ डिसेंबर २०२४  रोजी दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. हद्दपार असतांना पवन बावीस्कर कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता जिल्ह्यात प्रवेश करून तुकारामवाडी परिसरात सुरा घेवून दहशत माजवित असल्याची एमआयडीसी पोलिसांना मिळाली. पोलीसांच्या पथकाने तुकारामवाडी येथील दत्त मंदिराच्या गल्लीतून संशयित पवन उर्फ बद्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सुरा जप्त करण्यात आला असून त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    २० वर्षीय तरुणीचा मृतदेह रिक्षातून आढळला; पालकांचा धक्कादायक दावा

    February 20, 2026

    “मी दादागिरी करणारच” वक्तव्याने पेटला वाद; सपोनि चौधरी नियंत्रण कक्षात

    February 20, 2026

    चौघांनी केली तरुणावर धारदार शस्त्र व लोखंडी रॉडने मारहाण !

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.