Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अमळनेरात देहविक्री करणाऱ्या महिला आणि ग्राहकांना अटक !
    अमळनेर

    अमळनेरात देहविक्री करणाऱ्या महिला आणि ग्राहकांना अटक !

    editor deskBy editor deskJuly 2, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर : प्रतिनिधी

    गांधलीपुरा भागात अमळनेर पोलिसांनी कारवाई करत देहविक्री करणाऱ्या महिला आणि ग्राहकांना अटक केली आहे. पिटा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येत आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, गांधलीपुरा परिसरात देहविक्री व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना प्राप्त होत होत्या. या पार्श्वभूमीवर १ जुलै रोजी सायंकाळी ४:३० वाजता पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या नेतृत्वाखाली खासगी वाहनातून येऊन छापा टाकण्यात आला. वेगवेगळ्या घरांमध्ये चालणारा वेश्याव्यवसाय उघड झाला.

    डीवायएसपी विनायक कोते यांची परवानगी घेऊन ही कारवाई पार पडली. यामध्ये पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोलिस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, नामदेव बोरकर, समाधान गायकवाड, महिला होमगार्ड व इतर पोलिस अधिकारी सहभागी होते. यावेळी याठिकाणी काही ग्राहकही होते.

    या कारवाईत ग्राहक म्हणून उपस्थित असलेल्या शाहरुख शेख असलम (३०, खडकपूरा, पाळधी), समाधान मांगलू पाटील (३२, शिरसमणी), उदय दिलीप शितोळे (४०, भडगाव), निखील बापू बच्छाव (१९, पिंप्री), बस्तीलाल गोविंदा पाटील (३३, खडके खु., एरंडोल), जावेद शेख सत्तार (४२, गांधलीपुरा), नामदेव वामनराव बडगुजर (७८, चाळीसगाव) यांच्यासह एका अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक नामदेव बोरकर यांच्या फिर्यादीवरून पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जयंत पाटलांना रक्ताने आंघोळ? : पडळकरांचा खळबळजनक आरोप !

    March 25, 2026

    भोंदू खरात प्रकरण पेटले; “मोठ्या लोकांचा हात” : दमानिया यांचा गंभीर आरोप

    March 25, 2026

    मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर तरुणाचा मृत्यू; हलगर्जीपणाचा आरोप, जळगावात खळबळ

    March 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.