Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » खळबळजनक :वारीला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार !
    क्राईम

    खळबळजनक :वारीला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

    editor deskBy editor deskJune 30, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे : वृत्तसंस्था

    राज्यातील अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर अत्याचाराच्या घटना घडत असतांना आता एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. विठ्ठलाच्या वारीला निघालेल्या एका अल्पवयीन मुलीवर काही नराधमांनी लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना पुण्याच्या दौंड येथे घडली आहे. या घटनेमुळे वारकऱ्यांत एकच खळबळ माजली आहे.

    आषाढी वारीसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेत. यात लहान – थोरांपासून वृद्धांपर्यंत सर्वांचाच समावेश आहे. सर्वांना विठ्ठल – रुक्मिणीच्या दर्शनाची ओढ लागली आहे. त्यातच दौंड येथे एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्यामुळे मोठा संताप व्यक्त केला जात आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे ही संतापजनक घटना घडली आहे. मजल दरमजल करत पंढरपूरच्या दिशेने जाणारे वारकरी चहापाण्यासाठी येथे थांबले होते. त्यानंतर गाडीत बसताना 2 जण गाडीवरून तिथे आले. त्यांनी वारकऱ्यांच्या गळ्याला कोयता लावला.

    त्यानंतर त्यांनी वारकऱ्यांची लूट करून एका अल्पवयीन मुलीला आपल्यासोबत काही अंतरावर नेले. तिथे तिच्यावर अत्याचार केला. या घटनेमुळे दौंड तालुक्यासह संपूर्ण पुणे जिल्ह्यात खळबळ माजली आहे. या प्रकरणी दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. पोलिस अज्ञात आरोपींचा शोध घेत आहे. त्यांच्यापुढे आरोपींच्या मुसक्या आवळण्याचे मोठे आव्हान आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.