Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
    क्राईम

    औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

    editor deskBy editor deskJune 28, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी

    दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रात गुरुवारी (दि. २६ जून) रोजी कामाच्या दरम्यान झालेल्या अपघातात यशवंत भास्कर सोनवणे (वय अंदाजे ४०) या कंत्राटी कामगाराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे फेकरी गावासह परिसरात शोककळा पसरली असून, प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, मागील १२ वर्षांपासून सोनवणे हे कंत्राटदार धर्मेश पटेल यांच्या अधिपत्याखाली दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रात कार्यरत होते. गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता ५०० मेगावॅट युनिटमधून १५ कोळशाच्या डब्यांच्या गाड्या २१० मेगावॅट युनिटमध्ये हलविण्याचे काम सुरू होते. यावेळी रेल्वे लोकोमोटिव्हद्वारे रिलीव्ह करताना सोनवणे हे कपलिंग सेटिंगचे काम करत होते. दरम्यान, अचानक पाण्याचा फवारा सुरू झाल्यामुळे चालकाचे लक्ष विचलित झाले व याच वेळी सोनवणे हे लोको आणि डब्यांमध्ये अडकले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर त्यांना तातडीने भुसावळ येथील ट्रॉमा सेंटरमध्ये शवविच्छेदनासाठी हलविण्यात आले. सोनवणे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, भाऊ, दोन बहिणी व वडील असा परिवार आहे. या अपघातामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026

    बीड एसीबीची धडक कारवाई; तहसीलदारांविरोधात गुन्हा दाखल प्रक्रियेला सुरुवात

    February 20, 2026

    ‘मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, AI मदत करू शकते’ – राहुल गांधींना सुनावली टिपणी

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.