Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home »  जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी
    क्राईम

     जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

    editor deskBy editor deskJune 28, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शहरात वेगवेगळ्या ठिकाणी अपघातांमध्ये तीन जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी रामानंद नगर, शनिपेठ व एमआयडीसी पोलिस ठाण्यांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, नेरी नाका परिसरात २५ जून रोजी भरधाव ट्रकने (एमएच १९ सीवाय ५९४०) दुचाकीला धडक दिली. यावेळी दुचाकीस्वार मधुकर पाटील (७३, रा. तुळसाई नगर) हे खाली कोसळले. मागून येणाऱ्या डंपरचे (एमएच १९ सीवाय ४१८०) चाक वृद्धाच्या हातावरून गेले. त्यामुळे वृद्ध गंभीर जखमी झाले. या प्रकरणी ट्रक व डंपर चालकाविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    या सोबतच रस्ता ओलांडण्यासाठी कडेला उभे असलेल्या शेख मुक्तार मोहंमद शफी पिंजारी (५८, रा. मेहरुण) यांना भरधाव दुचाकीने धडक दिली. त्यात पिंजारी यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. हा अपघात २६ जून रोजी झाला. या प्रकरणी जखमीच्या फिर्यादीवरून दुचाकीस्वाराविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंप्राळा हुडको परिसरात २५ जून रोजी भरधाव वाहनाने विजय पाटील (रा. पिंप्राळा) यांना धडक दिली. त्यात ते जखमी झाले. या प्रकरणी जखमीचा मुलगा तुषार पाटील यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भरधाव क्रुझरची दुचाकीला जोरदार धडक; यावलमध्ये पोलीस कर्मचारी जखमी

    April 20, 2026

    अवैध धंद्यांच्या पार्श्वभूमीवर हल्ला? जळगाव तालुक्यात १९ वर्षीय तरुण गंभीर जखमी

    April 20, 2026

    आठ दिवसावर लग्न असताना तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

    April 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.