Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पहूर येथे चारचाकीने मायलेकीना दिली धडक : अखेर गुन्हा दाखल !
    क्राईम

    पहूर येथे चारचाकीने मायलेकीना दिली धडक : अखेर गुन्हा दाखल !

    editor deskBy editor deskJune 26, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जामनेर : प्रतिनिधी

    छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावर कारने दिलेल्या धडकेत अडीच वर्षाच्या चिमुकलीसह आई गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी उपचारानंतर पहूर पोलिसात जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील स्त्री रोग विभागातील सहायक प्राध्यापक डॉ. मिताली गोलेचा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील स्त्री रोग विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. संजय बनसोड व सहायक प्राध्यापक म्हणून डॉ. मिताली गोलेचा हे पती-पत्नी कार्यरत आहेत. दि. ३ जून रोजी डॉक्टर पती-पत्नी हे कारने (एमएच२१, सीए८२३३) जालना येथून जळगावला जात असताना पहूर येथे छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावर ज्योती गोपाल बोडखे (२३) व भाविका गोपाल बोडखे (२.५, पहूर) या मायलेकींना कारची धडक बसली होती.

    कार डॉ. मिताली गोलेचा चालवीत होत्या. अपघातात भाविका गंभीर जखमी झाली आहे. मायलेकींवर जळगाव येथील रुग्णालयात उपचार केल्यानंतर मंगळवारी ज्योती गोपाल बोडखे यांच्या फिर्यादीवरून डॉ. मिताली गोलेचा यांच्याविरुद्ध पहूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक फौजदार रवींद्र देशमुख करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026

    बीड एसीबीची धडक कारवाई; तहसीलदारांविरोधात गुन्हा दाखल प्रक्रियेला सुरुवात

    February 20, 2026

    ‘मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, AI मदत करू शकते’ – राहुल गांधींना सुनावली टिपणी

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.