Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » वाळूमाफियांचा थरार : दोन तलाठींसह तिघांना मारहाण ; १२ जणांविरोधात गुन्हा दाखल !
    क्राईम

    वाळूमाफियांचा थरार : दोन तलाठींसह तिघांना मारहाण ; १२ जणांविरोधात गुन्हा दाखल !

    editor deskBy editor deskJune 24, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भडगाव : प्रतिनिधी

    तालुक्यातील घोडदे येथे अवैध वाळू वाहतूक करताना पकडलेले दोन ट्रॅक्टर तहसील कार्यालयात आणत असताना २२ रोजी रात्री वाळू माफियांनी डोळ्यावर वाळू फेकत दोन ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) व एक कर्मचाऱ्यास मारहाण केली. याबाबत १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. प्रशांत भिका कुंभारे, विशाल सुर्यवंशी आणि मेहमूद जब्बार खाटीक अशा मारहाण झालेल्यांची नावे आहेत.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री भडगाव तहसील कार्यालयातील पथक गस्तीवर होते. त्यावेळी घोडदे शिवारात वाळूने भरलेले दोन ट्रॅक्टर आढळून आले. बेकायदा वाळू वाहतूक करणारे हे दोन्ही ट्रॅक्टर पुढील कारवाईसाठी तहसील कार्यालय भडगाव येथे आणले जात होते. त्याचवेळी रस्त्यात अचानक १० ते १२ लोक आले. यातील एका ट्रॅक्टरवर बसलेले ग्राम महसूल अधिकारी प्रशांत भिका कुंभारे यांच्या चेहऱ्यावर एकाने वाळू फेकली. दुसऱ्या ट्रॅक्टरवर बसलेले ग्राम महसूल सेवक विशाल सुर्यवंशी यांना ट्रॅक्टरवरून खाली ओढत त्यांना धक्काबुक्की केली आणि रस्त्याच्या कडेला ढकलून दिले.

    यानंतर तिसरे ग्राम महसूल अधिकारी मेहमूद जब्बार खाटीक यांना एकाने दोन्ही हाताने पकडून ठेवत त्यांना चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी आलेल्या पोलिस पथकाने एकाला पकडले. याबाबत भडगावचे मंडळ अधिकारी कुणाल सुकदेव कोळी (रा. राजीव गांधी कॉलनी, पाचोरा) यांच्या फिर्यादीवरून बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. या प्रकारामुळे वाळू माफियांवर प्रशासनाचा वचक राहिलेला नाही का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026

    बीड एसीबीची धडक कारवाई; तहसीलदारांविरोधात गुन्हा दाखल प्रक्रियेला सुरुवात

    February 20, 2026

    ‘मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, AI मदत करू शकते’ – राहुल गांधींना सुनावली टिपणी

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.