Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » खुनाच्या गुन्ह्यातील ३० लाखांचा मुद्देमाल मयताच्या वारसांना पोलिसांनी केला परत !
    क्राईम

    खुनाच्या गुन्ह्यातील ३० लाखांचा मुद्देमाल मयताच्या वारसांना पोलिसांनी केला परत !

    editor deskBy editor deskJune 23, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    खोटे नगर परिसरातील सेवानिवृत्त परिचारीका महिलेचा खून करून लाखोंची रक्कम लंपास केल्याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या आरोपींकडून जप्त करण्यात आलेली ३० लाख रुपये रक्कम सोमवारी २३ जून रोजी दुपारी १ वाजता मयत महिलेच्या नातेवाईकांना परत करण्यात आली. अशी माहिती पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, नाशिक येथील रहिवाशी असलेल्या सेवानिवृत्त परिचारीका असलेल्या स्नेहलता अनंत चुंबळे यांच्याजवळील ३० लाख रुपये मिळवण्याच्या लालसेपोटी कट रचला २० ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास संशयित आरोपी जिजाबराव अभिमन्यू पाटील (वय ४८, रा. अमळनेर, मूळ रा. खडकीसिम, ता. चाळीसगाव) आणि विजय रंगराव निकम (वय ४६, रा. अमळनेर, मूळ रा. विचखेडा, ता. पारोळा) यांनी कट रचला होता.

    दोघांनी स्नेहलता चुंबळे यांचा खून केला आणि त्यांच्या प्रेताची कुठेतरी विल्हेवाट लावल्याचा प्रकार समोर आला होता.याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होवून दोघांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून ३० लाख रूपयांची रोकड जप्त करण्यात आली होती. हे दोन्ही आरोपी जिल्हा परिषद, जळगाव येथे नेमणुकीला होते. जळगाव जिल्हा सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी फिर्यादी समीर उर्फ सौरभ संजय देशमुख आणि नातेवाईक संजय नानासाहेब देशमुख यांना ही रक्कम ताब्यात देण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026

    बीड एसीबीची धडक कारवाई; तहसीलदारांविरोधात गुन्हा दाखल प्रक्रियेला सुरुवात

    February 20, 2026

    ‘मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, AI मदत करू शकते’ – राहुल गांधींना सुनावली टिपणी

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.