Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई : चोरीचे तब्बल ३३ मोबाईलसह संशयित आरोपी अटकेत !
    क्राईम

    एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई : चोरीचे तब्बल ३३ मोबाईलसह संशयित आरोपी अटकेत !

    editor deskBy editor deskJune 23, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    जिल्ह्यातील अनेक ठिकाणाहून मोबाईल मोबाईल चोरीच्या घटना सातत्याने घडत असतांना या घटनांना आळा घालण्यासाठी एमआयडीसी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत चोरीचे तब्बल ३३ मोबाईल हस्तगत करण्यात आले असून, तरुण नोरसिंह गुजरिया (वय २३, रा. इंदूर, मध्य प्रदेश) या संशयित आरोपीला कासमवाडी परिसरातून अटक करण्यात आली आहे. अशी माहिती पोलीस अधिक्षक महेश्व रेड्डी यांनी सोमवारी २३ जून रोजी दुपारी १ वाजता पत्रकार परिषदेत दिली आहे.

    एमआयडीसी पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी आणि अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी श्री. संदीप गावीत आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी गुन्हे शोध पथकाला सुचना देण्यात आल्या होत्या.

    शनीवारी २१ जून रोजी जळगावातील कासमवाडी परिसरात बाजार असल्याने पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी पोउपनिरी राहुल तायडे, पोउपनिरी चंद्रकांत धनके, पोना प्रदीप चौधरी आणि पोकॉ रतन गिते यांना बाजारात पेट्रोलिंग करत असतांना त्यांना एक संशयित आरोपी तरुण आणि दोन अल्पवयीन मुले संशयीतरित्या फिरताना दिसले. त्यांच्यावर संशय आल्याने त्यांना ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे चार मोबाईल सापडले. मोबाईलबाबत विचारपूस केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्यांना पोलीस ठाण्यात आणून सखोल चौकशी केली असता, त्यांनी स्वामी नारायण मंदिराच्या जवळ पाल टाकून राहत असलेल्या शेतात जमिनीमध्ये एका पिशवीत मोबाईल पुरून ठेवल्याचे सांगितले.

    आरोपीला सोबत घेऊन पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. आरोपीने शेतातील एका झाडाजवळ जमिनीतून पुरून ठेवलेल्या पिशवीतील एकूण ४ लाख ९ हजार किंमतीचे ३३ मोबाईल काढून दिले. हे सर्व मोबाईल शनिवार बाजार तसेच जिल्ह्यातील वेगवेगळ्या बाजारांमधून चोरी केल्याची कबुली संशयित आरोपी आरोपी तरुण नोरसिंह गुजरिया याने दिली. प्त केलेल्या ३३ मोबाईलपैकी एक मोबाईल रावेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गहाळ झाल्याचे निष्पन्न झाले. रावेर पोलीस ठाण्याचे अंमलदार महेश मोगरे हे त्या मोबाईलच्या शोधात एमआयडीसी येथे आले असता, त्यांना रावेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गहाळ झालेले एकूण ८ मोबाईल त्यांच्या ताब्यात देण्यात आले. पुढील तपास पोना हेमंत जाधव हे करत आहेत.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026

    बीड एसीबीची धडक कारवाई; तहसीलदारांविरोधात गुन्हा दाखल प्रक्रियेला सुरुवात

    February 20, 2026

    ‘मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, AI मदत करू शकते’ – राहुल गांधींना सुनावली टिपणी

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.