फैजपूर : प्रतिनिधी
इस्लामपुरा भागातील एका १९ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ही घटना बुधवारी रोजी उघडकीस आली होती. याप्रकरणी गुरुवारी फैजपूर पोलिस ठाण्यात विवाहितेला माहेरून दोन लाख रुपये आणावे, यासाठी छळ करण्यात आला. या छळास कंटाळून तिने आत्महत्या केली. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
सविस्तर वृत्त असे कि, आरिफाबी जुबेर शेख (१९) या विवाहितेने घरात ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी गुरुवारी नसीबा संजय तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती शेख जुबेर शेख नदीम, शेख आफताब शेख नदीम व अनिसाबी शेख नदीम या तिघांविरुद्ध फैजपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक मैनुद्दीन सय्यद करीत आहे


