Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भरधाव चारचाकीचा थरार : महिलेचा दुर्देवी मृत्यू तर चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा !
    क्राईम

    भरधाव चारचाकीचा थरार : महिलेचा दुर्देवी मृत्यू तर चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा !

    editor deskBy editor deskJune 21, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    भरधाव कारचालकाने पादचारी व इतर वाहनांना धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या वंदना सुनील गुजराथी (वय ४९, रा. पार्वतीनगर) या महिलेचा शुक्रवारी (२० जून) पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी मोंटू शिवपाल सैनी (वय २६, रा. वाघ नगर) याच्याविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, वाघ नगरमधील मोंटू सैनी हा तरुण गुरुवारी (१९ जून) रात्री महाबळ परिसरातून कार (क्र. एमएच १९, ईपी १६९४) घेऊन भरधाव वेगाने जात होता.  यामध्ये वाहनचालक गंभीर जखमी झाला. त्यानंतर काही अंतरावर कारचालकाने वंदना गुजराथी या महिलेला धडक दिली. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान, सैनी याला नागरिकांनी पकडून रामानंद नगर पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्यावेळी तो मद्यधुंद अवस्थेत होता. या अपघातप्रकरणी मोंटू सैनी याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    चालक एकापाठोपाठ अनेक वाहनांना उडवत गेला व अनेक जण जखमी झाले. त्यावेळचा थरार पाहून जखमी बाजूला गेले व नंतर रुग्णालयात निघून गेले. मात्र पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी कोणीही न आल्याने अद्याप जखमींची एकूण संख्या स्पष्ट झालेली नाही.  महाबळ परिसरात भरधाव कारचा एवढा थरार होता की, तिचा वेग व वाहनांना उडवत जाण्याचे चित्र पाहून परिसरातील नागरिकांचा थरकाप उडाला. ही भरधाव कार येत असल्याचे दिसताच एका दुचाकीस्वाराने बाजूला उडी घेतली. त्यामुळे तो बालंबाल बचावला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026

    बीड एसीबीची धडक कारवाई; तहसीलदारांविरोधात गुन्हा दाखल प्रक्रियेला सुरुवात

    February 20, 2026

    ‘मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, AI मदत करू शकते’ – राहुल गांधींना सुनावली टिपणी

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.