Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दाणाबाजारात तरुणाला जबर मारहाण !
    क्राईम

    दाणाबाजारात तरुणाला जबर मारहाण !

    editor deskBy editor deskJune 15, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    ट्रान्सपोर्ट कार्यालयात पार्सल देण्यासाठी गेलेल्या मुस्तकीम शेख अलीम शेख (वय २०, रा. सुप्रिम कॉलनी) व प्रफुल्ल कोळी (रा. मोहाडी, ता. जळगाव) यांना दोन जणांनी शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच मुस्तकीम यांना लोखंडी पाईपाने मारहाणही करण्यात आली. ही घटना शुक्रवारी दाणाबाजारात घडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, शहरातील सुप्रिम कॉलनीत राहणारे मुस्तकीम शेख अलीम शेख हा तरुण भाटीया मार्केटमधील हार्डवेअरच्या दुकानात कामा आहे. दुकान मालक पवन दांडगे यांनी त्याला दाणा बाजार येथे जावून हिरा धनगर यांच्या ट्रान्सपोर्ट ऑफिसला पार्सल देण्यासाठी सांगितले. त्यामुळे मुस्तकीम हा त्याच्यासोबत काम करणारा प्रफुल्ल कोळी याला घेवून ट्रान्सपोर्ट ऑफिसला आले. यावेळी तेथे काम करणारा कुणाल कांबळे व त्याचा साथीदार यांनी त्याला शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली. यावेळी कुणाल कांबळे यांनी लोखंडी पाईपने मारहाण करीत दुखापत केली. दरम्यान, तरुणाने रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार दोघांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बीडमध्ये धक्कादायक प्रकार; सावत्र मुलासोबत महिला फरार

    April 20, 2026

    नशिराबादमध्ये पोलिसांची धडक कारवाई; बसस्थानक परिसरातून कट्ट्यासह सराईत आरोपी अटकेत

    April 20, 2026

    गावठी पिस्तूलसह दोन संशयित पकडले; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई !

    April 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.