Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » वरणगावनजीक दोन दुचाकीची धडक : एक ठार तर पाच जखमी !
    क्राईम

    वरणगावनजीक दोन दुचाकीची धडक : एक ठार तर पाच जखमी !

    editor deskBy editor deskJune 14, 2025Updated:June 14, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    वरणगाव : प्रतिनिधी

    शहरातील येथील छत्रपती शिवाजीनगर व रेणुकानगरला जोडणाऱ्या जुन्या महामार्गावरील पुलावर गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात अयुब खान रशीद खान (वय ६५) यांचा मृत्यू झाला. पाचजण गंभीर जखमी झाले आहेत.

    सविस्तर वृत्त असे कि, देवा संतोष गुमळकर (रा. वरणगाव, ता. भुसावळ) हा एम.एच. ३७, एच. ९११९ या दुचाकीने लखन सुरेश बाविस्कर, यश मनोज चावरीया, रोहित मुकेशतरु शाह या चौघा मित्रांसह भरधाव वेगाने जात होता. त्याने समोरून येणाऱ्या एम.एच. १९ ई. एम. ७५२९ या दुचाकीला धडक त्याच दुचाकी चालक आयुब खान रशिद खान (रा. साई पार्क वरणगाव), आणि त्यांचे मागे बसलेले सय्यद रशीद सय्यद अमीर ६५ (रा. खडका रोड, भुसावळ) हे धडक लागून रस्त्यावर फेकले गेले.

    त्यात अयुब खान यांचा जागीच मृत्यू झाला, तर सय्यद रशीद आणि इतर चारही तरुण गंभीर जखमी झाले आहेत. दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून जखमींना वरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी जळगाव सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याप्रकरणी देवा संतोष गुमळकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026

    बीड एसीबीची धडक कारवाई; तहसीलदारांविरोधात गुन्हा दाखल प्रक्रियेला सुरुवात

    February 20, 2026

    ‘मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, AI मदत करू शकते’ – राहुल गांधींना सुनावली टिपणी

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.