Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धक्कादायक : घरी एकटी असतांना १६ वर्षीय मुलीने संपविले आयुष्य !
    क्राईम

    धक्कादायक : घरी एकटी असतांना १६ वर्षीय मुलीने संपविले आयुष्य !

    editor deskBy editor deskJune 11, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शहरातील रजा कॉलनी परिसरातील रहिवासी रहीम पटेल हे कामावर तर आई नातेवाईकांकडे गेलेली असताना घरी एकटीच असलेल्या हुमेरा रहीम पटेल (१६, रा. रजा कॉलनी) या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (१० जून) दुपारी रजा कॉलनीत घडली. बाहेर खेळत असलेला तिचा भाऊ घरात गेला त्या वेळी ही घटना लक्षात आली.

    सविस्तर वृत्त असे कि, मजुरी काम करणारे रहीम पटेल हे नेहमीप्रमाणे मंगळवारी कामावर गेलेले होते व त्यांच्या पत्नी नातेवाईकांकडे गेल्या होत्या. वीज नसल्याने उकाड्यामुळे मुलगा घराबाहेर खेळत होता. त्यावेळी घरात एकटीच असलेल्या हुमेरा हिने गळफास घेतला. मुलीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    राज्याच्या राजकारणात खळबळ: १७ रिक्त जागांसाठी निवडणूक, मेमध्ये आणखी ९ जागांचा फैसला

    April 16, 2026

    बांधकाम कामगार भांडी योजना लाभासाठी शंभर रुपयांची लाच!

    April 16, 2026

    नाशिक धर्मांतर-छळ प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; ‘निदा खान’च मुख्य सूत्रधार !

    April 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.