Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » वटपाैर्णिमा विशेष : यंदा दोन दिवस सुवासिनी करु शकणार वटपूजन !
    राज्य

    वटपाैर्णिमा विशेष : यंदा दोन दिवस सुवासिनी करु शकणार वटपूजन !

    editor deskBy editor deskJune 10, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे : वृत्तसंस्था

    पतीच्या आयुष्याची दोरी बळकट होऊ दे, अशी प्रार्थना करण्याचा सण वडाला धागा बांधून वटपौर्णिमा यंदा महिलांना दोन दिवस साजरी करता येणार आहे. यंदा मंगळवारी (दि.१०) साडेअकरानंतर पाैर्णिमेला प्रारंभ होणार आहे. त्यामुळे या दिवशी सकाळी वटपुजन न करता दुपारनंतर महिला वटपूजन करणार आहेत. बुधवारी (दि.१०) सुर्याने पाहिलेली तिथी याही दिवशी दुपारी १.१५ वाजेपर्यंत पौर्णिमा असणार आहे. त्यामुळे यंदा दोन दिवस सुवासिनी महिलांना वटपूजनाची संधी मिळणार आहे.

    वटपौर्णिमेचा उपवास करुन सुवासिनी वडाला धागा गुंडाळून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते. भ्रदायोग असला तरी वटपौर्णिमा करता येते, अभ्यासकांनी स्पष्ट केले. दरम्यान, वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला बाजारात महिलांची भाज्या, आंबे खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. पूजेत आंब्याचा वापर केला असल्याने आंब्याचे दरही वाढले आहेत.

    मंगळवारी (दि.10) सकाळी साडेअकरा वाजेपासून बुधवारी दुपारी १.१५ या काळात महिलांना वटपूजन करता येणार आहे. याबाबत संभ्रम नसावा. भ्रदायोग असला तरी वटपाैर्णिमा करता येणार आहे. ज्या सुवासिनींना मंगळवारी अन्य कारणांनी वटपूजन करणे जमणार नाही. त्यांनी बुधवारी दुपारी एक वाजेपर्यंत करता येईल.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026

    ग्रामपंचायत बंद आंदोलन: विकासकामांवर परिणाम, सरकारकडे मागणी थेट

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.