Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तलवार व कोयता घेवून दहशत माजविणारा अटकेत !
    क्राईम

    तलवार व कोयता घेवून दहशत माजविणारा अटकेत !

    editor deskBy editor deskJune 10, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    गेल्या काही दिवसापासून शहरातील अनेक ठिकाणी तलवार व कोयत्यासारखी शस्त्रे घेऊन खुलेआम फिरून दहशत माजवण्याचे प्रकार समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली अशा व्यक्तींविरोधात विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. याच मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने इस्माइल गल्लीतून एका संशयितास अटक केली आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, दिनांक ९ जून २०२५ रोजी पो.ना. श्रीकृष्ण ईश्वरू यांनी मिळवलेल्या गुप्त माहितीच्या आधारे, शेळके व महालक्ष्मी माता मंदिर, तपोवन येथे एक इस्माइल बोबडे नावाचा युवक तलवार व कोयता घेऊन फिरत असल्याची माहिती समोर आली. यावरून पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद बागल, पोहेकॉ. प्रमोद पाटील, पो.कॉ. रवींद्र बारी यांनी संबंधित ठिकाणी धाड टाकून संशयित बोबडे याला पकडले.

    त्याच्याकडून एक लोखंडी कोयता व एक तलवार हस्तगत करण्यात आली. प्राथमिक चौकशीत संशयिताचे नाव श्रावण जंगारे, वय २६, रा. माजी बाडा, बोबडे वाडा, बोबडे ता. बोदवड असे असल्याचे समोर आले. त्याच्याकडून मिळालेल्या शस्त्रांची किंमत सुमारे ४५०० रुपये असल्याचे पोलीसांनी सांगितले. या प्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ च्या कलम ३७ (१) तसेच मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026

    बीड एसीबीची धडक कारवाई; तहसीलदारांविरोधात गुन्हा दाखल प्रक्रियेला सुरुवात

    February 20, 2026

    ‘मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, AI मदत करू शकते’ – राहुल गांधींना सुनावली टिपणी

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.