जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील जळके येथील माहेर असलेल्या आरती अनिल इंगळे (वय ३२, रा. भांडूप वेस्ट मुंबई) यांच्या चारित्र्यावर सासरच्यांकडून संशय घेत त्यांना छळ केला जात होता. तसेच विवाहितेला स्वयंपाक निटनिटका करता येत नाही व विवाहितेने माहेरुन पाच लाख रुपये आणावे या करीता त्यांचा मानसिक व शारिरीक छळ होवू लागल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
हा छळ असह्य झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. त्यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली असून त्यानुसार सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ स्वप्निल पाटील हे करीत आहे.



