Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » प्रभात चौकात अपघात : दुचाकीस्वार गंभीर जखमी !
    क्राईम

    प्रभात चौकात अपघात : दुचाकीस्वार गंभीर जखमी !

    editor deskBy editor deskJune 1, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्यामुळे विकास अमृतकर हे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. हा अपघात शनिवारी (३१ मे) रात्री प्रभात चौक उड्डाणपुलावर झाला. जखमीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

    सविस्तर वृत्त असे कि, शिवकॉलनीकडून आकाशवाणी चौकाकडे दुचाकीवरून (क्र. एमएच ४१, झेड ९९११) विकास अमृतकर जात होते. यावेळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला फेकले गेल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या विषयी जिल्हापेठ पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी जखमीस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    संतापजनक : ३४ वर्षीय मावशाने केला १६ वर्षीय मुलीवर अत्याचार, मुलगी गर्भवती !

    April 15, 2026

    जळगावात एटीएममध्येच हातचलाखी : कार्ड बदलून निवृत्त व्यक्तीचे २.३१ लाख लंपास !

    April 15, 2026

    संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

    April 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.