Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बसस्थानकातून महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीला !
    क्राईम

    बसस्थानकातून महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीला !

    editor deskBy editor deskMay 27, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शहरातील नवीन बसस्थानकातून चाळीसगाव बसमध्ये चढत असताना एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीला गेल्याची धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी ६ वाजता घडली आहे. या प्रकरणी संबंधित महिलेच्या फिर्यादीवरून एका ३० वर्षीय महिलेसह एका अल्पवयीन मुलीवर जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, जानकीनगर, जळगाव येथील रहिवासी लक्ष्मी प्रमोद चौधरी (वय ३५) या रविवारी सायंकाळी जळगाव बसस्थानकावर चाळीसगाव बसमध्ये चढत होत्या. त्यावेळी बसमध्ये प्रवाशांची नेहमीप्रमाणेच मोठी गर्दी होती. याच गर्दीचा गैरफायदा घेत ध्रुपता अक्षय भोसले (वय ३०, रा. छत्रपती संभाजीनगर) आणि तिच्यासोबत असलेल्या एका अल्पवयीन मुलीने लक्ष्मी चौधरी यांच्या गळ्यातील सोन्याच्या मंगळसूत्राची पोत कापली. त्यातील सोन्याची वाटी आणि मणी चोरून घेऊन गर्दीतूनच पळ काढला. आपल्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीला गेल्याचे लक्षात येताच लक्ष्मी चौधरी यांनी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्या ठिकाणी संशयित आरोपी धुरपता अक्षय भोसले आणि तिच्या अल्पवयीन साथीदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगावच्या युवकांना मिळणार ‘खेलो इंडिया’ची नवी दिशा; २७ ऑगस्टला तीन ठिकाणी भव्य आयोजन

    August 25, 2026

    पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार राजू मामा भोळेंचा पाठपुरावा फळाला! जळगावच्या उद्योगांना ‘D+’चा बूस्टर; सामंतांचे मोठे निर्देश

    August 25, 2026

    ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे !

    August 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.