Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तरुणीवर अत्याचार करून बनवला व्हिडीओ ; गुन्हा दाखल !
    क्राईम

    तरुणीवर अत्याचार करून बनवला व्हिडीओ ; गुन्हा दाखल !

    editor deskBy editor deskMay 27, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बोदवड : प्रतिनिधी

    शहरातील एका राजकीय पक्षाच्या व्यक्तीची २२ वर्षीय मुलगी बाहेरगावी शिक्षण घेत असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून गौरव मुकुंदा साठे (वय २३, रा. बोदवड) याने ओळख निर्माण करत या तरुणीस जळगाव येथे एका हॉटेलमध्ये नेऊन अत्याचार केला. अत्याचार करत असतानाचे फोटो काढले व व्हिडीओही केला. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत या तरुणीकडून वेळोवेळी ऑनलाइन अॅपच्या माध्यमातून रक्कमही उकळली.

    वारंवार होणाऱ्या पैशाच्या मागणीने त्रासून या तरुणीने याबाबत तिच्या आईकडे कैफियत मांडली. यानंतर आई व वडिलांनी तरुणीला विश्वासात घेतले असता तिने सर्व माहिती त्यांना दिली. ही माहिती बोदवड पोलिसांना दिली असता, रात्री उशिरापर्यंत या बाबत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. दरम्यान, तरुणीच्या आई-वडिलांना व मुलाला जिवे ठार करण्याची धमकीही आल्याचे सांगण्यात आले. हा गुन्हा जलगाव पोलिसांच्या हद्दीत घडल्याने याबाबत शून्य क्रमांकने गुन्हा जळगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जळगावमध्ये अभिवादन

    February 21, 2026

    गच्चीवर मंडप, तिथेच दहावीची परीक्षा; बीडमधील धक्कादायक नियोजनशून्यता

    February 21, 2026

    धक्कादायक : प्रसिद्ध विधिज्ञ अॅड. शेख यांच्या धारदार शस्त्राने हल्ला !

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.