Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कृषी विभागाचे आवाहन : शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवडीची घाई करू नये !
    कृषी

    कृषी विभागाचे आवाहन : शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवडीची घाई करू नये !

    editor deskBy editor deskMay 26, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    राज्यात यंदाच्या वर्षी मान्सूनचा प्रवास वेगाने सुरू झाल्याने २५ मे रोजीच दक्षिण कोकणात तो दाखल झाला आहे. तब्बल दहा दिवस आधी पावसाने राज्यात वर्दी दिली आहे. दरम्यान पुढच्या दोन दिवसात मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होणार असून राज्यातील हवामानात लबवकरच मोठे बदल दिसून येणार आहेत. शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात रविवारी करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाने रविवारी केले आहे.

    ज्यातील अनेक भागात मान्सून पूर्वीचा वादळी पाऊस पडला आहे. आपल्या भागात मान्सून लवकरच दाखल होईल, अशी अपेक्षा करून अथवा खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी विशेषतः कोरडवाहू शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. राज्यातील हवामानात लवकरच मोठे बदल दिसून येतील.

    सध्याच्या अंदाजानुसार २७ मे पासून राज्यातील हवामान हळूहळू होईल आणि काही प्रमाणात तापमानात वाढदेखील होईल. मे महिन्याच्या शेवटपर्यंत कोकण वगळता बहुतांश भागात प्रामुख्याने कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे, आणि किमान ५ जूनपर्यंत ही स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. या दरम्यान देशातील इतर भागात सुद्धा मान्सूनचा प्रवास तात्पुरता थांबू शकतो. त्यामुळे आपल्या भागात मान्सून लवकरच दाखल होईल अशी अपेक्षा करून शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    महाराष्ट्रात गॅस टंचाईचा अलर्ट: उद्योग आणि हॉटेल व्यवसाय ठप्प!

    March 10, 2026

    बारामती विमान दुर्घटना प्रकरण तापले; कंपनी मालकाची चौकशी, घातपाताचाही संशय

    March 10, 2026

    युद्धाच्या पार्श्वभूमीवरही सोन्याला ब्रेक; जळगावात दर १५०० रुपयांनी घसरले

    March 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.