Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जुन्या वादातून तरुणावर चाकू आणि दगडांनी जीवघेणा हल्ला
    क्राईम

    जुन्या वादातून तरुणावर चाकू आणि दगडांनी जीवघेणा हल्ला

    editor deskBy editor deskMay 26, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शिवाजीनगर परिसरात जुन्या वादातून एका तरुणावर चाकू आणि दगडांनी जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना २३ मे रोजी घडली आहे. यात तरुणाचा पाय फॅक्चर झाला असून, त्याला गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी, २४ मे रोजी जळगाव शहर पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    फिर्यादीनुसार गजानन विकास बाविस्कर (वय ३०, रा. शिवाजीनगर, हुडको, जळगाव) हा खासगी कंपनीत नोकरीला आहे. २३ मे रोजी रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास, जुन्या वादाच्या कारणावरून मनीष रामू बिन्हाडे, संगम देवा भोई आणि कृष्णा पांडुरंग सोनवणे (सर्व रा. जळगाव) यांनी गजाननला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर, मनीषने चाकूने गजाननच्या डोक्यावर आणि हातावर वार केले. इतर आरोपींनी त्याच्या छातीवर आणि डाव्या पायावर मोठा दगड टाकल्याने, गजाननचा पाय फॅक्चर झाला. या जीवघेण्या हल्ल्यानंतर संशयित आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

    गंभीर जखमी झालेल्या गजानन बाविस्करला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी गजानन बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिन्ही संशयित आरोपींविरोधात जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. ओमप्रकाश सोनी हे करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बीडमध्ये धक्कादायक प्रकार; सावत्र मुलासोबत महिला फरार

    April 20, 2026

    नशिराबादमध्ये पोलिसांची धडक कारवाई; बसस्थानक परिसरातून कट्ट्यासह सराईत आरोपी अटकेत

    April 20, 2026

    गावठी पिस्तूलसह दोन संशयित पकडले; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई !

    April 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.