Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बॅटरी चोरणाऱ्या दोघांना २४ तासात ठोकल्या बेड्या !
    क्राईम

    बॅटरी चोरणाऱ्या दोघांना २४ तासात ठोकल्या बेड्या !

    editor deskBy editor deskMay 22, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शहरात बॅटरी चोरीचे प्रकार वाढले असताना, एमआयडीसी पोलिसांनी २४ तासांच्या आत एका चोरीचा छडा लावला आहे. अजिंठा चौफुली येथील चौधरी बॅटरी ट्रेडिंग या दुकानातून ४१ जुन्या बॅटऱ्या चोरून नेणाऱ्या दोन संशयित आरोपींना पोलिसांनी तेल्हारा, जि. अकोला येथून अटक केली असून, त्यांच्याकडून सहा लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, १७ मे रोजी, अब्दुल्ला किताबुल्ला चौधरी यांच्या दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी ४१ हजार रुपये किमतीच्या ४१ जुन्या बॅटऱ्या चोरल्या होत्या. १९ मे रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली डीबी पथकाने घटनास्थळावरील आणि आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली. चोरट्यांनी पांढऱ्या रंगाचे बोलेरो पिकअप वाहन वापरल्याचे निष्पन्न झाले.

    तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी तेल्हारा, अकोला येथे जाऊन अजमदउल्ला अमानतउल्ला खान (वय २४) आणि सैय्यद दानिश सैय्यद ईसमाईल (२५) या दोन संशयित आरोपींना बुधवारी अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेल्या ३१ हजार किमतीच्या विविध कंपन्यांच्या बॅटऱ्या आणि गुन्ह्यात वापरलेले सहा लाख रुपये किमतीचे पिकअप वाहन (एमएच ३० बीडी ६८७३) जप्त केले आहे. एकूण ६ लाख ३१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    दोन वाईन शॉप फोडणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

    February 21, 2026

    “मोठ्या लोकांचा पाठिंबा असल्यानेच धाडस?” : रोहित पवारांचा सवाल

    February 21, 2026

    ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जळगावमध्ये अभिवादन

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.