Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » प्रेयसीशी व्हिडीओ कॉल करून संपविले आयुष्य !
    अमळनेर

    प्रेयसीशी व्हिडीओ कॉल करून संपविले आयुष्य !

    editor deskBy editor deskMay 15, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर : प्रतिनिधी

    गुजरात राज्यातील पोस्कोचा गुन्हा दाखल असलेल्या एका आरोपीने अमळनेर बसस्थानकाजवळील लॉजमध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना १३ रोजी सायंकाळी उघडकीस आली. विशेष म्हणजे आत्महत्येपूर्वी त्याने आपल्या प्रेयसीशी व्हिडीओ कॉल करुन मी आता ‘ऑपरेशन मौत’ जवळ पोहोचल्याचे तिला सांगितले.

    सविस्तर वृत्त असे कि, सौरभ शर्मा (रा. अहमदाबाद) असे आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे. गेल्या पाच ते सहा दिवसापासून त्याने अमळनेर येथील पाठक प्लाझामध्ये करणसिंग एम.पी. या नावाने लॉजमध्ये रुम बूक केली होती. घटनेच्या आदल्या रात्री सौरभने लॉजमधील कर्मचा-यांना मला सकाळी उशिरा उठवा, असा निरोप दिला होता. १३ रोजी दुपारी लॉजचे कर्मचारी त्याला उठवायला गेले तेव्हा त्याने आवाज दिला नाही. दरवाजा आतून बंद होता. सायंकाळी पुन्हा त्याला उठवण्याचा प्रयत्न केला असता आवाज आला नाही म्हणून पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनी दरवाजा तोडून आता पाहिले असता त्याने गळफास घेतलेला आढळून आला.

    सौरभवर गुजरातमध्ये पोस्कोचा गुन्हा दाखल आहे. त्याने मृत्यूपूर्वी प्रेयसीशी व्हिडीओ कॉल करून मी ‘ऑपरेशन मौत’ जवळ पोहोचलो आहे असे म्हटले आहे. सौरभने त्याच्या डायरीत त्याला फसविलेल्या मुलीचा व तिच्या नातेवाइकांचा उल्लेख केला असल्याचे समजते. याप्रकरणी अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    दोन वाईन शॉप फोडणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

    February 21, 2026

    “मोठ्या लोकांचा पाठिंबा असल्यानेच धाडस?” : रोहित पवारांचा सवाल

    February 21, 2026

    ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जळगावमध्ये अभिवादन

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.