Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » म्हसावद : रेल्वे फाटकाजवळ रेल्वे रुळांजवळ ठेवले दगड
    क्राईम

    म्हसावद : रेल्वे फाटकाजवळ रेल्वे रुळांजवळ ठेवले दगड

    editor deskBy editor deskMay 7, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    तालुक्यातील म्हसावद रेल्वे फाटकाजवळ रेल्वे रुळांजवळ दगड ठेवले असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सुदैवाने यामुळे कोणतीही दुर्घटना झाली नसली तरी यामुळे रेल्वेच्या यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली होती. रेल्वे फाटकाजवळ रेल्वे थांबल्यानंतर काही प्रवासी खाली उतरले होते. त्यातील एकाने रुळांमधील ही खडी ही रुळावर ठेवल्याचे रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

    मध्य रेल्वे विभागातील म्हसावद रेल्वे फाटकाजवळील रेल्वे रुळाजवळ आणि रुळावर सोमवारी दगड ठेवलेले असल्याचा प्रकार ट्रॅकमन व काही नागरिकांच्या लक्षात आला. त्यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ रुळावर ठेवलेले दगड बाजूला करण्यात आले. ही बाब त्यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यानुसार रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी पोहचले. या प्रकारामुळे रेल्वेला कोणताही विलंब झालेला नसून कोणतीही दुर्घटना घडली नसल्याचे रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

    हा प्रकार उघडकीय येण्यापुर्वी एक रेल्वे याठिकाणी थांबलेली होती. त्यावेळी काही प्रवासी हे रेल्वेतून उतरुन रुळावर बसले होते. बसलेल्यांपैकी कोणीतरी रुळांमधील खडी उचलून ती रुळावर आणि त्याच्या बाजूला ठेवल्याचा अंदाज रेल्वेच्या सुरक्षा बलाने वर्तविला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    दोन वाईन शॉप फोडणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

    February 21, 2026

    “मोठ्या लोकांचा पाठिंबा असल्यानेच धाडस?” : रोहित पवारांचा सवाल

    February 21, 2026

    ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जळगावमध्ये अभिवादन

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.