Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बस व दुचाकीच्या अपघातात जखमी प्रौढाचा दुर्देवी मृत्यू !
    क्राईम

    बस व दुचाकीच्या अपघातात जखमी प्रौढाचा दुर्देवी मृत्यू !

    editor deskBy editor deskMay 6, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    रावेर : प्रतिनिधी

    रावेर ते सावदा रस्त्यावरील बिंबे पेट्रोल पंपाजवळ बस व दुचाकीच्या २७रोजी झालेल्या अपघातात दुचाकीवरील तांदलवाडी येथील दोघे जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी जळगाव येथे रवाना केले होते. यातील दुचाकीमागे बसलेले विजय तुकाराम पाटील (वय ५३) यांच्यावर मुंबईत खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचा शनिवारी मृत्यू झाला.

    विवरे गावाकडून रावेरकडे येणारी बस (एमएच- २०, बिएल ३००६) ही २७ रोजी रावेर ते सावदा रस्त्यावरील बिंबे पेट्रोल पंपाजवळ आली. या वेळी दुचाकी स्वार पंपावर पेट्रोल भरून रस्त्यावर येत असताना बस व दुचाकी यांच्यात अपघात झाला होता. यात तांदलवाडी येथील सार्थक विजय पाटील (वय २०) व विजय तुकाराम पाटील (वय ५३) हे जखमी झाले होते.  अपघातानंतर जखमींना रावेर ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केले होते.  तर दुचाकीवर मागे बसलेले विजय पाटील हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचारा दरम्यान त्यांचा ३ रोजी मृत्यू झाला. रविवारी त्यांच्यावर राहत्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    दोन वाईन शॉप फोडणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

    February 21, 2026

    “मोठ्या लोकांचा पाठिंबा असल्यानेच धाडस?” : रोहित पवारांचा सवाल

    February 21, 2026

    ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जळगावमध्ये अभिवादन

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.