Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ३० वर्षीय पशुपालकाने संपविले आयुष्य !
    क्राईम

    ३० वर्षीय पशुपालकाने संपविले आयुष्य !

    editor deskBy editor deskMay 5, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    चारा घेण्यासाठी जात असल्याचे सांगून शेतात गेलेल्या भरत रतन वाघ (३०, रा. बिलवाडी, ता. जळगाव) या पशुपालकाने झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रविवारी (४ मे) दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कर्जाचे ओझे वाढत गेल्याने त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील बिलवाडी येथील रतन वाघ यांचा दुग्धव्यवसाय आहे. बचत गटासह पतसंस्थेकडून कर्ज काढून त्यांनी म्हशी खरेदी केल्या होत्या. मात्र, त्यातून पुरेसे उत्पन्न मिळत नसल्याने ते चिंतेत होते. रविवारी वाघ हे गुरांसाठी चारा घेण्यासाठी शेतात गेले होते. तेथे त्यांनी झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला.

    हा प्रकार काहींना दिसताच त्यांनी ग्रामस्थांना घटनेची माहिती दिली. ग्रामस्थांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. वाघ यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली, मुलगा व भाऊ असा परिवार आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जामनेर : १६ वर्षीय मुलीचा विनयभंग : एका विरोधात गुन्हा दाखल !

    April 21, 2026

    चोपड्यात थरारक खून प्रकरणाचा २४ तासांत छडा : संशयित आरोपी अटकेत !

    April 21, 2026

    लातूर हादरला : आईसह दोन निष्पाप जीवांचा दुर्दैवी अंत !

    April 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.