Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मोठी बातमी : लाडक्या बहिणींना आता मिळणार केवळ ५०० रुपये !
    राजकारण

    मोठी बातमी : लाडक्या बहिणींना आता मिळणार केवळ ५०० रुपये !

    editor deskBy editor deskApril 15, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुती सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेली लाडकी बहीण योजनेवर पुन्हा एकदा टाच झाली आहे. या योजनेच्या माध्यमातून ज्या महिलांना आर्थिक मदत केली जाते, त्याच महिलांची नावे नमो शेतकरी सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये देखील आहेत. अशा आठ लाख महिलांना आता दीड हजार रुपये ऐवजी पाचशे रुपये महिना मिळणार आहे. या योजनेतील अटीनुसार दोन योजनेचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे आता या महिलांचे पैसे कमी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

    नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या आठ लाख महिलांना आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता कमी मिळणार आहे. या महिलांना दीड हजार रुपये ऐवजी पाचशे रुपये या महिन्यापासून मिळणार आहेत. लाडकी बहीण योजनेतील नियमानुसार एका सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलेला दुसऱ्या सरकारी योजनेचा लाभ घेता येणार नाही. नमो शेतकरी योजनेत महिलांना सहा हजार रुपये वर्षाला मिळतात. तसेच केंद्र सरकारकडून देखील पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून सहा हजार रुपये मिळतात. म्हणजेच या महिलांना शासकीय योजनेच्या माध्यमातून वर्षाला 12000 रुपये मिळत आहे. त्यामुळे आता या महिलांना वर्षाला केवळ सहा हजार रुपये लाडकी बहीण योजनेतून मिळणार आहेत.

    केंद्र सरकारने किसान सन्मान निधी योजना सुरू केली होती. त्यानंतर आता त्याच धर्तीवर 2023 मध्ये महाराष्ट्र सरकारने देखील महाराष्ट्र नमो महा सन्मान योजना सुरू केली होती. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तीन टप्प्यात वार्षिक सहा हजार रुपयांची मदत केली जाते. म्हणजे चार महिन्याला दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. तर केंद्र सरकारचे सहा हजार असे बारा हजार रुपये या महिलांना मिळतात. त्यामुळे अशा महिलांना आजा लाकडी बहिण योजनेचे केवळ वर्षाला सहा हजार रुपये मिळणार आहेत.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026

    ग्रामपंचायत बंद आंदोलन: विकासकामांवर परिणाम, सरकारकडे मागणी थेट

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.