Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मोहाडी रोडवर भरधाव ट्रकने मुलाला चिरडले; जिल्हा रूग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश
    क्राईम

    मोहाडी रोडवर भरधाव ट्रकने मुलाला चिरडले; जिल्हा रूग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रMarch 23, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी । मोहाडीरोडवर भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीच्या मागे असलेल्या सुजय गणेश सोनवणे (वय१३) रा. मोहाडी ता.जि.जळगाव या मुलाचा चिरडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना घटनाच नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालयात धाव घेवून प्रचंड आक्रोश केला होता.

    याबाबत माहिती अशी की, सुजय सोनवणे हा मुलगा आज दुपारी १२ वाजेच्या दरम्यान सेंट टरेसा शाळेतून घरी जात होता. त्यावेळीगावाजवळ असलेल्या उताराजवळ (एमएच २८ बी ७७०३) या क्रमांकाच्या भरधाव ट्रकने त्यांच्या (एमएच १९ डीएम १११) या क्रमांकाच्या दुचाकीला धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, या दुर्घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. सुजयचा मृतदेह जिल्हा रूग्णालयात आणला असून तेथे आप्तांनी प्रचंड गर्दी केली आहे. जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जि.प. सदस्य पवन सोनवणे, जळगाव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल आदींसह इतरांनी जिल्हा रूग्णालयात धाव घेतली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    ब्रेकिंग न्यूज | धुळे जिल्हा हादरला! हळदीच्या दिवशीच रक्तस्नान; पिंपळनेरमध्ये तिहेरी हत्याकांड

    February 19, 2026

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.