Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी !
    क्राईम

    इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी !

    editor deskBy editor deskFebruary 25, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    कोल्हापूर : वृत्तसंस्था

    राज्यात नुकताच ‘छावा’ चित्रपट सुरु असून या चित्रपटाला मोठा प्रतिसाद लाभत असतांना आता इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. भूमिका मांडताना ब्राम्हणद्वेष पसरवल्याचा आरोप करत प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीने फोनवरून धमकी दिल्याची माहिती इंद्रजित सावंत यांनी फेसबुक पोस्टमधून दिली आहे. सावंत यांनी फेसबुकवर संपूर्ण कॉल रेकॉर्डिंग पोस्ट केले आहे.

    याबाबत माध्यमांशी बोलताना इंद्रजित सावंत यांनी सांगितले की, साधारण १२ वाजता धमकीचा फोन आला होता. ती व्यक्ती शिव्या घालून जातीवाचक बोलत होती. छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला. हा महाराष्ट्र पेशव्यांचा होत आहे का? अशी खंत वाटते. राज्याच्या गृहमंत्रालयाकडून संबंधितावर कारवाई करावी. त्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतले आहे. त्यांनी यावर कारवाई करून आपण सर्व समाजाचे आहोत हा संदेश द्यावा. मुख्यमंत्री फडणवीस अशा व्यक्तीवर कारवाई करतील. संबधित व्यक्तीची मोठ्या नेत्यांबरोबर उठबस आहे. अशा पद्धतीच्या धमकीला भीक घालत नाही. माझे संरक्षण करण्यास मी समर्थ आहे. माझे नातेवाईक, सहकारी सक्षम आहेत. संभाजी महाराज यांचा इतिहास मी कसा बदलू. इतिहासाचे दाखले ब्रिटिश काळापासून आहेत. खोटा इतिहास, घाणेरडा इतिहास सांगावा, अशी त्याची इच्छा आहे. पण, खोटा इतिहास आम्ही का सांगू, त्या-त्या वेळी ते मुद्दे खोडून काढले आहेत, असे सावंत म्हणाले.

    दरम्यान, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देऊन तुमची औकात दाखवली, हिशोबात रहा. संभाजी ब्रिगेड सावंत यांच्या सोबत आहे. त्यांच्या केसाला जरी धक्का लावाल तर, सोडणार नाही, गाठ संभाजी ब्रिगेड’शी आहे, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संतोष शिंदे यांनी दिला आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ढोल-ताशांच्या गजरात महाराष्ट्र रंगला

    March 3, 2026

    सोलापुरात महिला महाराष्ट्र केसरीचा रणसंग्राम!

    March 3, 2026

    जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खननाविरोधात महसूल विभागाची धडक कारवाई

    March 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.