Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पिंपळकोठा गावाजवळ भीषण अपघात : पत्नी ठार तर पतीसह तीन मुले गंभीर !
    क्राईम

    पिंपळकोठा गावाजवळ भीषण अपघात : पत्नी ठार तर पतीसह तीन मुले गंभीर !

    editor deskBy editor deskFebruary 24, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    जिल्ह्यातील अनेक भाविक शिर्डी येथे दर्शनासाठी नेहमीच जात असतात. मात्र आता शिर्डीहून मुक्ताईनगरला परतणाऱ्या कुटुंबाच्या वाहनाचा भीषण अपघात झाला आहे या अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून, पती व तीन मुले गंभीर जखमी झाली आहेत. ही घटना एरंडोल ते धरणगाव दरम्यानच्या पिंपळकोठा गावाजवळ घडला आहे. मृतदेह एरंडोल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. असून जखमींवर उपचार सुरू आहेत या संदर्भात एरंडोल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

    मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर येथील शिक्षक राजेश वासुदेव पाटील (वय 46) हे आपल्या पत्नी रुपाली पाटील (वय 40) आणि तीन मुलांसह शिर्डीला देवदर्शनासाठी गेले होते. सोमवारी 24 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 12.30 वाजता मुक्ताईनगरकडे परतताना, एरंडोल ते जळगाव दरम्यान नॅशनल हायवेवर युपी ढाब्यासमोर अचानक आलेल्या कंटेनरने त्यांची मारुती स्विफ्ट कार (MH-19-CQ-7009) ने जात असताना कंटेनर क्रमांक (WB-23-F9472) हा रस्त्यावर अचानक आल्याने पाटील यांची कार त्याला मागून धडकली. धडकेनंतर कार रस्त्याच्या डिव्हायडरवर आदळली. या भीषण अपघातात राजेश पाटील, त्यांच्या पत्नी रुपाली पाटील आणि तीन मुले—खुशी, स्वरा आणि गुरु हे सर्व जण गंभीर जखमी झाले.

    अपघातानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांनी तत्काळ मदतकार्य हाती घेतले. रुग्णवाहिकेद्वारे जखमींना एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी रुपाली पाटील यांना मृत घोषित केले. त्याचवेळी तीन मुलांना एरंडोल येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. फिर्यादी राजेश पाटील यांच्या म्हणण्यानुसार, कंटेनरचालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अचानक वाहन रस्त्यावर आणल्यामुळे अपघात झाला. त्यांच्या पत्नीच्या मृत्यूला आणि मुलांच्या दुखापतीस कंटेनरचालकच जबाबदार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या घटनेनंतर राजेश पाटील यांनी एरंडोल पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, कंटेनर चालकाविरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026

    बीड एसीबीची धडक कारवाई; तहसीलदारांविरोधात गुन्हा दाखल प्रक्रियेला सुरुवात

    February 20, 2026

    ‘मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, AI मदत करू शकते’ – राहुल गांधींना सुनावली टिपणी

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.