Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » एलसीबी पथकाची आठ दिवसात गांजा विक्री करणाऱ्यांवर दुसऱ्यांदा कारवाई !
    क्राईम

    एलसीबी पथकाची आठ दिवसात गांजा विक्री करणाऱ्यांवर दुसऱ्यांदा कारवाई !

    editor deskBy editor deskFebruary 24, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चोपडा : प्रतिनिधी

    जिल्ह्यातील अनेक ठिकाणी गांजाची कारवाई सुरु असतांना नुकतेच चोपडा ते धरणगाव रोडवरील निमगव्हाण गावातील बसस्थानक समोरील हॉटेल मनोज समोरील रोडवर दुचाकीवरून गांजाची वाहतूक करीत असतांना स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यानी ताब्यात घेतले आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, दि.२३ फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या आदेशानुसार स्थागुशा पथकातील पीएसआय. गणेश वाघमारे, अनिल जाधव, पो.हे.कॉ.दिपक माळी, पो.हे.कॉ. रवींद्र पाटील यांनी चोपडा ग्रामीण.पो.स्टे.गु. र.न.26/2025 NDPS अंतर्गत 22B,20,प्रमाणे चोपडा ते धरणगाव रोडवरील निमगव्हाण गावातील बसस्थानक समोरील हॉटेल मनोज समोरील  रोडवर आरोपी नामे अमित दिलीप बरडे वय 22 वर्ष रा.जोगवाडा ता.नेवाली जि.बढवाणी म.प्र.हा त्याचे ताब्यातील मोटार सायकल Zupeter क्रमांक MP46 Zc6443 चे सिटखाली डीक्कीत पारदर्शक प्लास्टिक पिशवीत व गाडीचे पाय ठेवण्याची जागा पायदान जवळील एका गोणीमधुन असे एकुण 13 किलो गाजाची स्वताच्या फायद्यासाठी व चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतुक करीत असताना स्वःताच्या जवळ बाळगताना मिळुन आला तसेच त्याच्या ताब्यात एकूण 13 किलो गाजाची किमत 124000,पाढरां रंगाची टिव्हीएस ज्युपीटर कंपनीची मोटरसायकल 50000 रूपये किमतीची व एक आय फोन कंपनीचा काळ्यारगाचा मोबाईल 60000 रूपये किमतीचा असा एकूण 244000 रूपये किमतीचा मुद्देमाल सह मिळुन आला  म्हणुन त्यास ताब्यात घेवुन पुढील योग्य त्या कारवाई साठी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.