Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » एकनाथ शिंदेंनी दिला कॉंग्रेसला धक्का ; माजी आमदार देणार साथ !
    राजकारण

    एकनाथ शिंदेंनी दिला कॉंग्रेसला धक्का ; माजी आमदार देणार साथ !

    editor deskBy editor deskFebruary 14, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    राज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने राज्यातील अनेक ठिकाणच्या दिग्गज नेत्यांना आपल्या पक्षात घेवून ताकद वाढविण्याचे काम सुरु असतांना नुकतेच ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. शिवसेना शिंदे गटातील इनकमिंग सुरूच आहे. त्यातच आता काँग्रेससह इतर पक्षांनाह बरीच गळती लागल्याचे दिसत आहे.

    गोंदिया जिल्ह्यात शिवसेना मजबूत होण्याच्या वाटेवर असून काँग्रेससग इतर पक्षांना मोठा धक्का बसला आहे. गोंदिया जिल्ह्यात सध्या काँग्रेस सह इतर पक्षांना मोठ्या प्रमाणामध्ये गळती सुरू झाली असून अनेक दिग्गज नेते हे विविध पक्षांमध्ये प्रवेश घेत असल्याचे दिसून येत आहे. अशातच अर्जुनी मोरगाव विधानसभेचे माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे आणि त्यांचे पुत्र सुगत चंद्रिकापुरे यांनी मुंबई येथे शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. विशेष म्हणजेच तिसऱ्या आघाडीकडून सुगत चंद्रिकापुरे यांनी विधानसभेची निवडणूक लढली होती. मात्र त्यांनी काँग्रेसला रामराम करत शिवसेनेची वाट धरली.

    एवढंच नव्हे तर आता आमगाव देवरी विधानसभेचे आमदार सहसराम कोरोटे हे आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेना गटामध्ये प्रवेश करण्याची चर्चा सध्या रंगली आहे. विश्वसनीय सूत्रांद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, येत्या 20 तारखेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ते शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे काँग्रेसला पुन्हा एकदा जोरदार झटका बसणार आहे. शिवसेनेतील इनकमिंग गेल्या काही महिन्यात वाढलं असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा एक दिग्गज नेतासुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महायुतीतील सहकारी पक्ष असलेल्या अजित पवार गटातील नेताही शिंदेंच्या शिवसेनेत येणार असल्याने महायुतीमध्ये कुरबूरी वाढण्याती शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांत काँग्रेससह इतर पक्षांनाही गळती लागली असून गोंदिया जिल्ह्यामध्ये मात्र शिवसेना पक्ष मजबूत होण्याच्या मार्गावर आहे. आता येणाऱ्या 20 तारखेला कोण कोण प्रवेश करतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026

    बीड एसीबीची धडक कारवाई; तहसीलदारांविरोधात गुन्हा दाखल प्रक्रियेला सुरुवात

    February 20, 2026

    ‘मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, AI मदत करू शकते’ – राहुल गांधींना सुनावली टिपणी

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.