Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दागिन्याचे दुकान फोडणारे सराईत गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात
    क्राईम

    दागिन्याचे दुकान फोडणारे सराईत गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात

    editor deskBy editor deskFebruary 13, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    पाचोरा शहरातील सोन्याच्या दुकानात झालेल्या घरफोडी प्रकरणाचा पर्दाफाश करत पाचोरा पोलिसांनी एका कुख्यात गुन्हेगाराला अटक केली आहे. यासोबतच चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, दि.२ फेब्रुवारी २०२५ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञात चोरट्यांनी पाटील ज्वेलर्स या सराफा दुकानाचे चॅनल गेट तोडून दुकानात प्रवेश केला. चोरट्यांनी दुकानातील CCTV कॅमेऱ्यांची तोडफोड करून DVR चोरला आणि ६८,००० रुपयांचे सोने-चांदीचे दागिने लंपास केले. या प्रकरणी दुकानाचे मालक राहुल विश्वनाथ चव्हाण यांनी पाचोरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

    पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय वेरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी तपास पथक स्थापन केले.

    पाचोरा पोलिसांनी फिंगरप्रिंट तज्ज्ञ आणि डॉग स्क्वॉड यांना घटनास्थळी बोलावून तपासाची सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेजमधून चोरटे एका सफेद बोलेरो वाहनाने आले आणि पसार झाल्याचे स्पष्ट झाले. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना ही माहिती देण्यात आली. दरम्यान, धरणगाव पोलीस ठाण्यात एक बोलेरो वाहन चोरीस गेल्याची नोंद झाली होती. तपासादरम्यान, रामानंद नगर पोलिसांनी ७ फेब्रुवारीला सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवली. त्यानुसार रणजितसिंग जीवनसिंग जुन्नी (रा. राजीव गांधी नगर, जळगाव) याचा तपास सुरू झाला.

    पोलीसांनी ८ फेब्रुवारी रोजी रणजितसिंगला राजीव गांधी नगर, जळगाव येथून अटक केली. यावेळी गुन्ह्यात वापरण्यात आलेली बोलेरो (क्रमांक MH-19-AX-7098) जप्त करण्यात आली. अटकेनंतर चौकशीत आरोपीने कबुली दिली की, त्याने ४ फेब्रुवारी रोजी खामगाव, बुलढाणा येथे ATM फोडण्याचा प्रयत्न केला होता. फरार आरोपींचा शोध सुरू रणजितसिंगच्या चौकशीत त्याच्या अन्य तीन साथीदारांची नावे उघड झाली: भगुलसिंग ऊर्फ शक्तीसिंग जुन्नी (रा. जळगाव), सुवेरसिंग राजुसिंग टाक (रा. मानवद, परभणी), शेरुसिंग स्वजितसिंग बोंड (रा. बोंड, परभणी) या तिघांनी मिळून पाचोरा ज्वेलर्स चोरी केली आणि मुद्देमाल जळगावमधील एका सोनाराच्या दुकानात गहाण ठेवला. पाचोरा पोलिसांनी तात्काळ जळगाव गाठून चोरीला गेलेले सोने-चांदीचे दागिने (६७,०८१ रुपये किमतीचे) जप्त केले. अटक आरोपी रणजितसिंग जुन्नी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी १३ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यात मलकापूर, रामानंद नगर, जिल्हापेठ, शनिपेठ, एरंडोल आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेले घरफोडी, दरोडे, शस्त्रास्त्र कायद्याचे गुन्हे यांचा समावेश आहे.

    यांनी केली कारवाई

    पाचोरा पोलिसांनी जलदगतीने तपास करत गुन्ह्याचा छडा लावल्याबद्दल पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी तपास पथकाचे विशेष कौतुक केले. या कारवाईत पोलीस निरीक्षक अशोक पवार, उपनिरीक्षक सोपान गोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील, पोलीस हवालदार राहुल शिंपी, योगेश पाटील, सागर पाटील आणि मजिदखान पठाण यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    नवीन बायपासवर पहाटेचा भीषण अपघात; सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू

    March 2, 2026

    पाणी भरण्याचा प्रयत्न ठरला जीवघेणा; विजेच्या धक्क्याने १४ वर्षीय धिरजचा मृत्यू

    March 2, 2026

    “सर्वोच्च न्यायालयाच्या अटक वॉरंट”ची धमकी; १८ लाखांची सायबर लूट !

    March 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.