Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » संसार बहरण्यापूर्वीच विवाहितेचा प्रवासात दुर्देवी मृत्यू
    क्राईम

    संसार बहरण्यापूर्वीच विवाहितेचा प्रवासात दुर्देवी मृत्यू

    editor deskBy editor deskJanuary 31, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    दोन महिन्यांपूर्वी लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच विवाहीता मुंबई येथे संसाराचा सामान घेऊन रेल्वेतून प्रवास करीत होत्या. वाटेतच अचानक विवाहितेची तब्येत बिघडली आणि त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना अकोला ते जळगाव रेल्वे स्टेशनदरम्यान घडली. प्रियंका अक्षय सुरोशे (वय २०, रा. ज्ञानेश्वर नगर, अकोला) असे मयत विवाहीतेचे नाव आहे. या घटनेमुळे विवाहितेच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी भुसावळ रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, अकोला येथील अक्षय सुरोशे हे मुंबईतील एका खाजगी कंपनीत नोकरीस आहे. त्यांचे प्रियंका यांच्यासोबत दोन महिन्यांपुर्वीच विवाह झाला होता. दोन महिने सासरी राहिल्यानंतर मुंबईत स्थायिक होण्यासाठी त्या सासूसोबत निघाल्या होत्या. दि. २९ जानेवारी रोजी रात्री आठ वाजता अमरावती-मुंबई एक्सप्रेसमध्ये आपल्या सासू साधना सुरोशे यांच्यासोबत त्यांनी प्रवास सुरू केला. त्यांच्यासोबत संसाराचा सामानही होता. शेगाव स्थानकाजवळ प्रियंकाने जेवण केले. मात्र, काही वेळाने मलकापूरजवळ अचानक त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांना उलट्या सुरू झाल्या, प्रकृती अधिक खालावल्याने सासू साधना सुरोसे यांनी रेल्वेतील टीसीशी संपर्क साधून तातडीने वैद्यकीय मदतीची मागणी केली.

    विवाहितेची अचानक तब्येत बिघडल्यामुळे टीसीने भुसावळ येथे उपचार मिळतील असे सांगितले. मात्र, प्रियंका यांची प्रकृती अधीकच खालावत गेली. रेल्वे भुसावळ स्थानकात पोहोचताच त्यांना तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र, रात्री १२ वाजता त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रियंका यांचा मृतदेह जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आला. नवविवाहितेचया मृत्यूची बातमी कळताच माहेरच्या मंडळींनी रुग्णालयात धाव घेतली आणि एकच हंबरडा फोडीत आक्रोश केला. त्यांच्या पश्चात पती अक्षय सुरोसे, सासू, आई-वडील, भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. या घटनेची भुसावळ रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास रेल्वे पोलीस कर्मचारी नंदू खरडे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मध्यरात्री घरात घुसून ४८ वर्षीय महिलेचा विनयभंग !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026

    चेन्नईच्या समुद्रात जळगावचा जय बेपत्ता; कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.