Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मोठी बातमी : आता वाल्मिक कराड याचा शस्त्र परवाना रद्द
    क्राईम

    मोठी बातमी : आता वाल्मिक कराड याचा शस्त्र परवाना रद्द

    editor deskBy editor deskJanuary 12, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बीड : वृत्तसंस्था

    राज्यातील बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येला एक महिना उलटला आहे. मात्र अद्याप याप्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. त्यातच आता वाल्मिक कराड याचा शस्त्र परवाना रद्द करण्यात आला आहे.

    बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणाची चौकशी सुरु झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे आदेश दिले होते. बीडमधील अनेक तरुणांचे बंदूक हातात घेताना, बंदुकीतून गोळ्या झाडतानाचे फोटो व्हायरल होत आहेत. यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी सातत्याने केली जात होती. यानंतर देवेंद्र फडणवीसांनी बंदुकीसोबत ज्या कोणाचे फोटो आहेत, त्यांचे परवाने रद्द करा, असे आदेश दिले होते. यानंतर आता दोन आठवड्यांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी १०० जणांना शस्त्र परवाना रद्द करण्याची नोटीस पाठवली आहे.

    बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आज सर्वात मोठी कारवाई केली आहे. बीडमधील शस्त्र परवाना रद्द प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी 100 जणांना नोटीस पाठवली आहे. त्यावेळी शस्त्र तात्काळ जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच निलंबित झाल्यानंतर ही शस्त्र सापडल्यास फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती दिली आहे. या कारवाईत वाल्मिक कराड यांचाही शस्त्र परवाना रद्द करण्यात आला आहे. वाल्मिक हा सध्या cid कोठडीत असल्याने त्याच्यापर्यंत अद्याप ही नोटीस पोहोचली नाही. मात्र कोठडीतून बाहेर आल्यानंतर वाल्मिकला नोटीस दिली जाणार आहे. वाल्मिक कराडला खंडणीच्या गुन्ह्यात अटक झाली आहे.

    या प्रकरणाच्या चौकशीसाठी विविध चौकशी समिती नेमण्यात आल्या आहेत. त्यातच अटकेत असलेल्या आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. तर दुसरीकडे संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचे बोललं जात आहे. वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जळगावमध्ये अभिवादन

    February 21, 2026

    गच्चीवर मंडप, तिथेच दहावीची परीक्षा; बीडमधील धक्कादायक नियोजनशून्यता

    February 21, 2026

    धक्कादायक : प्रसिद्ध विधिज्ञ अॅड. शेख यांच्या धारदार शस्त्राने हल्ला !

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.