Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भरधाव ट्रकला कार धडकली : पहिल्याच एकाच परिवारातील ४ ठार तर दोन गंभीर !
    क्राईम

    भरधाव ट्रकला कार धडकली : पहिल्याच एकाच परिवारातील ४ ठार तर दोन गंभीर !

    editor deskBy editor deskJanuary 1, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जालना : वृत्तसंस्था

    देशभरात आज नववर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात केली असून पहिल्याच दिवशी कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. सोलापूर- धुळे महामार्गावर अंबड तालुक्यातील महाकाळा येथे उभ्या ट्रकला कार धडकून हा भीषण अपघात आज (दि. १) दुपारी बाराच्या सुमारास झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजी नगर येथील कुटे व जालना येथील चौरे कुटुंबीय हे अक्कलकोट येथून देवदर्शन करून परत येत होते. ते आपल्या कारने (एमएच २० सीएस ६०४१) घरी परत येत होते. हा अपघात इतका भीषण होता की, गाडीचा चक्काचूर झाला.
    या अपघातातील मृतांची नावे अनिता परशुराम कुटे (वय ४८, रा. छ. संभाजीनगर) , भागवत यशवंत चौरे (वय ४७), सृष्टी भागवत चौरे (वय १३), वेदांत भागवत चौरे (वय ११, सर्व रा.अंबड रोड जालना) येथील रहिवाशी आहेत. गाडीचा चालक जखमी झाला आहे.

    परशुराम लक्ष्मण कुटे ५५ हे स्वतः गाडी चालवत होते. ते छ.संभाजीनगर येथील रहिवाशी आहेत. तर छाया भागवत चौरे (वय ४०, रा. अंबड रोड, जालना) या जखमी झाल्या आहेत. अक्कलकोटवरून गणपूरला जात असलेल्या भाविकांच्या गाडीला अपघात होऊन चार भाविकांचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. मृत सर्व एकाच कुटुंबातील असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    राजकीय वाद न्यायालयात; राहुल गांधींना पुन्हा जामीन

    February 21, 2026

    दोन वाईन शॉप फोडणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

    February 21, 2026

    “मोठ्या लोकांचा पाठिंबा असल्यानेच धाडस?” : रोहित पवारांचा सवाल

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.