Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » चिमुकल्या मुलीसह महिलेने संपविले माहेरी जीवनयात्रा
    क्राईम

    चिमुकल्या मुलीसह महिलेने संपविले माहेरी जीवनयात्रा

    editor deskBy editor deskDecember 27, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    एरंडोल : प्रतिनिधी

    शहरातील एरंडोल येथील महादेव मंदिर परिसरात गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास तिसऱ्या मजल्यावरील घरात गळफास घेऊन महिलेने आपल्या नऊ वर्षीय मुलीसह आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही.

    मिळालेल्या माहितीनुसार, सपना प्रकाश माळी (३३) आणि केतकी माळी (९) अशी या मृत माय- लेकींची नावे आहेत. घटनास्थळी गादीवर वही आढळून आली आहे. त्यात सपना हिने आपल्या आत्महत्येस कोणीही जबाबदार नाही, असा उल्लेख केला आहे. एरंडोल येथे जहांगीरपुरा भागातील महादेव मंदिर परिसरात सपना माळी ही माहेरी राहत होती. आठ वर्षांपूर्वी तिचा घटस्फोट झाला होता. गुरुवारी दुपारी तिसऱ्या मजल्यावरील खोलीचा दरवाजा आतून लावलेला होता.

    सपना हिचा भाऊ राहुल हा घरी आला असता त्याला त्याची बहीण व भाची घरी दिसले नाहीत. त्याने तिसऱ्या मजल्यावर जाऊन बघितले असता खोलीचा दरवाजा आतून लावलेला होता. त्याने बहिणीला आवाज दिला असता काही एक उत्तर मिळाले नाही. शेवटी दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी सपना व केतकी या दोघी गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आल्या. त्यावेळी राहुलने एकच हंबरडा फोडला. याबाबत एरंडोल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा : दोन दलालांना अटक

    February 24, 2026

    कर्जत घाटवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत चालकाचा मृत्यू, बसमधील प्रवासी जखमी

    February 24, 2026

    महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत मजूर ठार, एक गंभीर !

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.