Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » नाचायला नव्हे, वाचायला आली… ‘नटरंगी नार’ गौतमी पाटील पुन्हा चर्चेत
    राजकारण

    नाचायला नव्हे, वाचायला आली… ‘नटरंगी नार’ गौतमी पाटील पुन्हा चर्चेत

    editor deskBy editor deskDecember 21, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे : वृत्तसंस्था

    राज्यात आपल्या तूफान नृत्याने आणि अदांनी सर्वांना भुरळ पाडणारी, प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिचं नाव सर्वांनाच परिचित आहे. तिच्या कार्यक्रमांप्रमाणेच ती आता चित्रपटाच्या मोठ्या पडद्यावरही झळकणार आहे. पण या सगळ्या झगमगत्या विश्वापासून दूर, स्वत:चं एक वेगळं ( कल्पनेचं) जग निर्माण करता येतं, अशा पुस्तकांच्या जगात आज तिने प्रवेश केला. पुण्यामध्ये सध्या ‘पुणे बूक फेस्टिव्हल’ सुरू असून त्याला फक्त पुणेकरांचाच नव्हे तर इतर शहरातील वाचकांचाही भरभरून प्रतिसाद मिळताना दिसत आहे. पुण्यातील वाचकांसह इतर शहरातील वाचकही या बूक फेस्टिव्हलला भेट देण्यासाठी आवर्जून गर्दी करताना दिसत असून सोशल मीडियावरही याचा बराच बोलबला आहे.

    याच बूक फेस्टिव्हलला चक्क प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिने हजेरी लावली. ‘ आतापर्यंत मी नाचायला जात असते, आज मात्र वाचायला आले आहे’ असे म्हणत गौतमीने या बूक फेस्टिव्हलमध्ये येऊन आपण खूप उत्साहित असल्याचे नमूद केलं. नेहमी डान्स करत असते आज मात्र मी वाचनासाठी आले आहे, आतापर्यंत वाचनासाठी वेळ काढत नव्हते, पण आता फावल्या वेळेत वाचनाची ही चांगली सवय जोपासणार असल्याचे तिने नमूद केलं.

    मी लहानपणापासून या गोष्टींमध्ये कधी गेलेच नाही. आत्तापर्यंत मी फक्त डान्स डान्स करत होते, पण आज काही वेगळं करायला आले आहे असं गौतमीने सांगितलं. पुण्यात एवढा मोठा पुस्तक महोत्सव भरला आहे. आजपर्यंत मला पुस्तकं वाचायची संधि तर मिळाली नाही, पण आज इथे येऊन पुस्तकांच्या या दुनियेत मी फेरफटका मारणार आहे. इथून पुढे मी पुस्तकं नक्की वाचणार आहे असे सांगतानाच तुम्ही सगळ्यांनीही आवर्जून पुस्तकं वाचा असं आवाहन तिने सर्व वाचकांना केलं. पुस्तक ही खूप छान गोष्ट आहे , त्यातून तुम्हाला बरंच काही शिकायला मिळतं, मीही आता वाचाणार आहे, तु्म्हीही सर्वांनी नक्की वाचा, असा प्रेमळ आग्रह गौतमीने केला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    राजकीय वाद न्यायालयात; राहुल गांधींना पुन्हा जामीन

    February 21, 2026

    “मोठ्या लोकांचा पाठिंबा असल्यानेच धाडस?” : रोहित पवारांचा सवाल

    February 21, 2026

    ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जळगावमध्ये अभिवादन

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.