Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भरधाव डंपरची दुचाकीला जबर धडक : दोन जिवलग मित्र जागीच ठार
    क्राईम

    भरधाव डंपरची दुचाकीला जबर धडक : दोन जिवलग मित्र जागीच ठार

    editor deskBy editor deskDecember 20, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    फुपनगरी फाट्याजवळ जळगावकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोन युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ५:३० वाजता घडली आहे. फुपनगरी फाट्याजवळ असलेल्या वळणवर अपघातांची मालिका सुरूच असून, गेल्या वर्षभरात झालेला हा चौथा अपघात आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार,  अपघातात पंकज शंकर कोळी (वय २६) आणि अमोल आनंदा कोळी (वय २७, दोन्ही रा. घार्डी ता. जळगाव) हे दोघे मित्र जागीच ठार झाले. हे दोघे दुचाकीने (एमएच १९ एव्ही ३४४६) जळगावहून घरी घार्डीकडे निघाले असताना कानळदाकडून जळगावकडे खडी भरुन जाणाऱ्या (एमएच १९ झेड ८०६७) डंपरने फुपनगरी फाट्याजवळ जोरदार धडक दिली. अपघाताच्या ठिकाणावरुन ५० ते ७० मीटरपर्यंत दोघांना फरफटत नेले. दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. यानंतर डंपर चालकाने पळ काढला.

    फुपनगरी व वडनगरी फाट्याच्या मध्ये मुख्य रस्त्यावर मोठे वळण आहे. या वळणाच्या ठिकाणीच गेल्या वर्षभरात झालेला हा चौथा अपघात आहे. महाशिवरात्रीच्या वेळेस झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला होता. तर जून महिन्यात एका दांम्पत्याचा अपघात होऊन, दोघं गंभीर जखमी झाले होते पंकज व अमोल हे दोन्ही जीवलग मित्र होते. दोघेही सेंट्रींग काम करत होते, दोघांना शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टर खरेदी करावयाचे होते. ते ट्रॅक्टर पाहून ते घरी जात होते. मात्र, घरी जाण्याच्या अगोदरच त्यांच्यावर काळाने झडप घातली. दोघा मित्रांच्या अपघाताची माहिती मिळताच घार्डी ग्रामस्थांनी अपघातस्थळी गर्दी केली होती. दोघांचे मृतदेह पाहताच, नातेवाईकांनी मन हेलावणारा आक्रोश केला. अपघाताची माहिती मिळताच तालुका पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी हजेरी लावली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा : दोन दलालांना अटक

    February 24, 2026

    कर्जत घाटवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत चालकाचा मृत्यू, बसमधील प्रवासी जखमी

    February 24, 2026

    महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत मजूर ठार, एक गंभीर !

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.