Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात सीबीआयचे पथक दाखल : बीएचआरसह मविप्र प्रकरणाची करणार चौकशी !
    क्राईम

    जळगावात सीबीआयचे पथक दाखल : बीएचआरसह मविप्र प्रकरणाची करणार चौकशी !

    editor deskBy editor deskDecember 17, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    बीएचआर’ प्रकरणी दाखल आलेल्या गुन्ह्यात मदतीसाठी लाखो रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी तत्कालीन विशेष सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाणांविरुद्ध चाळीसगाव पोलिसात तर मविप्र प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासकामी दिल्ली सीबीआयचे पथक सोमवारी जळगावात दाखल झाले. हे पथक या गुन्ह्याशी संबंधित असलेल्यांची चौकशी करुन त्यांचे जाबजबाब नोंदविण्यासाठी आठ दिवस ठाण मांडून बसणार आहे.

    भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटीप्रकरणी दाखल गुन्ह्यात सुनिल झंवर यांना कोठडीत मदत करण्यासाठी चाळीसगावातील एका मद्य विक्रेत्याच्यामार्फत तत्कालीन सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांनी लाच मागितली होती. याप्रकरणी सुरज झवर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन चाळीसगाव पोलिस ठाण्यात तत्कालीन विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यासह चाळीसगावचा मद्य व्यापारी व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सोबतच जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादीत या शैक्षणिक संस्थेच्या वादप्रकरणी कट रचून संस्थेचे सचिव नीलेश भोईटे यांच्या घरात सुरा ठेवणे व इतर घडामोडीप्रकरणी दि. ७ ऑक्टोंबर २०२२ जळगाव शहर पोलिस ठाण्यात नीलेश भोईटे यांनी तक्रार दिली होती. त्यावरून गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पुरवणी जबाबावरून अॅड. प्रवीण चव्हाण यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    बीएचआर व मविप्रशी संबंधित असलेल्या चाळीसगाव व जळगाव शहर पोलिस ठाण्यात दाखल या दोन्ही गुन्ह्यांच्या तपासासाठी सोमवारी सीबीआयचे पथक जळगावात दाखल झाले. यामध्ये सीबीआयचे अपर पोलिस अधीक्षक सशांत यांच्यासह दोन जणांचा समावेश आहे. हे अधिकारी आठ दिवस जळगावात थांबून या दोन्ही गुन्ह्यांशी संबंधित असलेल्यांची चौकशी करणार आहे.

    तत्कालीन विशेष सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांच्यांशी संबंधित असलेल्या प्रकरणांच्या चौकशीसाठी यापुर्वी देखील सीबीआयचे पथक जळगावात आले होते. त्यांनी त्यावेळी देखील चौकशी केली होती. मात्र यावेळेस हे पथकाचा थेट आठ दिवस मुक्काम राहणार आहे. अॅड. प्रवीण चव्हाण यांची दोन्ही प्रकरणात काय भूमिका होती यासह इतरांच्याही सहभागाविषयी चौकशी यावेळी केली जाणार आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा : दोन दलालांना अटक

    February 24, 2026

    कर्जत घाटवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत चालकाचा मृत्यू, बसमधील प्रवासी जखमी

    February 24, 2026

    महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत मजूर ठार, एक गंभीर !

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.