Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जामनेर रोडवर रात्रीच्या सुमारास अपघात : १४ जण जखमी !
    क्राईम

    जामनेर रोडवर रात्रीच्या सुमारास अपघात : १४ जण जखमी !

    editor deskBy editor deskDecember 15, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जामनेर : प्रतिनिधी

    जामनेर रस्त्यावरील सोनाळा फाट्याजवळ महिंद्रा पिकअप गाडी उलटून झालेल्या अपघातात १४ जण जखमी झाल्याची घटना १३ रोजी रात्री १०.३० ते ११ वाजेच्या सुमारास घडली.

    मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातून पावरा समाजाचे जवळपास ४० मजूर ऊस तोडण्यासाठी महिंद्रा पिकअप गाडीने महाराष्ट्रात येत होते. दरम्यान, जामनेर ते पहुर रस्त्यावरील सोनाळा फाट्याजवळील वळणावर ही गाडी उलटली. या अपघातात पावरा समाजाचे एकूण १४ जण जखमी झाले आहेत. यातील धर्मा बारेला (वय ३०), जितेंद्र बारेला (वय १६, सुभा राजू बारेला (वय १३), तुळशीराम बारेला (वय ३५), अनिल तोवरसिंग बारेला (वय ३०) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले होते. तर ९ जणांना पहूर ग्रामीण रुग्णालयात आणून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.

    दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पहुर येथील १०८ रुग्णवाहिकेचे चालक अमजद खान व डॉक्टर लियाकत अब्बासी यांनी धाव घेतली. तसेच दोन वेळा रुग्णवाहिकेतून सर्व जखमींना रुग्णालयात आणले. जखमींमध्ये लहान बालकांचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच पहुर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. परंतु, अद्यापपर्यंत याबाबत गुन्हा दाखल झाला नसल्याचे समजते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा : दोन दलालांना अटक

    February 24, 2026

    कर्जत घाटवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत चालकाचा मृत्यू, बसमधील प्रवासी जखमी

    February 24, 2026

    महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत मजूर ठार, एक गंभीर !

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.