Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » नफ्याचे अमिष दाखवत व्यापाऱ्याची ३४ लाखात फसवणूक !
    क्राईम

    नफ्याचे अमिष दाखवत व्यापाऱ्याची ३४ लाखात फसवणूक !

    editor deskBy editor deskDecember 15, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    वेगवेगळ्या ट्रेडिंग ग्रुपमध्ये समावेश करून नफ्याचे अमिष दाखवत भुसावळ येथील एका व्यापाऱ्याची ३४ लाख रुपयांमध्ये ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. हा प्रकार दि. १ जानेवारी ते दि. १३ डिसेंबरपर्यंत घडला. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    भुसावळ येथील व्यापाऱ्याला दि. १ जानेवारी रोजी एका ग्रुपच्या माध्यमातून अॅप डाऊनलोड करायला सांगितले. त्यानंतर दोन महिलांनी त्यांना वेगवेगळ्या ट्रेडिंग ग्रुपमध्ये जॉईन करून घेतले व त्यांना गुंतवणूक करण्यास सांगितली. त्यातून अधिक नफा देतो, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर वेगवेगळ्या बँक खात्यात वेळोवेळी एकूण ३४ लाख रुपये ऑनलाईन स्वीकारले. या व्यापाऱ्याने वेळोवेळी रक्कम गुंतविल्यानंतर अनेक दिवस होऊनही त्यांना कोणताही नफा मिळाला नाही. अनेक दिवस मुद्दलही परत मिळाली नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले व त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक नीलेश गायकवाड करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा : दोन दलालांना अटक

    February 24, 2026

    कर्जत घाटवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत चालकाचा मृत्यू, बसमधील प्रवासी जखमी

    February 24, 2026

    महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत मजूर ठार, एक गंभीर !

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.