Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » चेंगराचेंगरी भोवली : अभिनेता अल्लू अर्जूनला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी !
    क्राईम

    चेंगराचेंगरी भोवली : अभिनेता अल्लू अर्जूनला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी !

    editor deskBy editor deskDecember 13, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

    अवघ्या देशभरात ‘पुष्पा २’ सिनेमाचा धुमाकूळ सुरु असतांना हैदराबाद येथे ४ डिसेंबर रोजी ‘पुष्पा 2’ सिनमाच्या प्रदर्शनादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी अभिनेता अल्लू अर्जून याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या चेंगराचेंगरीच्या प्रकरणात पोलीसांनी अभिनेता अल्लू अर्जून याला अटक केली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबादमध्ये ४ डिसेंबर रोजी ‘पुष्पा 2’ सिनमाच्या प्रदर्शनादरम्यान अल्लू अर्जुन पोलिसांना न कळवता प्रीमियरला गेला होता असा आरोप करण्यात आला होत. ज्यामुळे अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी जमली आणि चेंगराचेरीत महिलेचा मृत्यू झाला. शिवाय महिलेच्या मुलाची प्रकृती देखील चिंताजनक आहे. हैदराबाद पोलिसांनी अल्लू अर्जुन, त्याची सुरक्षा टीम आणि थिएटरच्या व्यवस्थापनाविरुद्ध विविध कलमांतर्गत अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

    मृत महिलेच्या पतीनं दिलेल्या तक्रारीवरून ५ डिसेंबर रोजी चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अल्लू अर्जुनच्या अगोदर हैदराबाद पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, थिएटर व्यवस्थापन किंवा कलाकारांच्या टीमकडून ते थिएटरला भेट देणार असल्याची कोणतीही सूचना नव्हती. थिएटर व्यवस्थापनानेही गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी सुरक्षेबाबत कोणतीही अतिरिक्त तरतूद केलेली नाही. रेवती (वय ३५) आणि तिचा मुलगा श्री तेज (वय १३) यांना मोठ्या प्रमाणात लोकांच्या गर्दीमुळे चिरडले गेले होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सरपंच परिषदेच्या लढ्याला यश; ६ महिन्यांची प्रशासक म्हणून मुदतवाढ जाहीर

    February 21, 2026

    राजकीय वाद न्यायालयात; राहुल गांधींना पुन्हा जामीन

    February 21, 2026

    दोन वाईन शॉप फोडणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.