Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मोठी बातमी : राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी अजित पवारांची निवड
    राजकारण

    मोठी बातमी : राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी अजित पवारांची निवड

    editor deskBy editor deskNovember 24, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई :  वृत्तसंस्था

    राज्यात विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक, विक्रमी महाविजय नोंदवत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीने महाराष्ट्रातील सत्ता दणदणीत बहुमताने पुन्हा हस्तगत केली असून, सोमवारी किंवा मंगळवारी नव्या सरकारचा शपथविधीदेखील होऊ घातला आहे. दरम्यान, आज मुंबईत राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक झाली. यामध्ये राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी अजित पवारांची निवड करण्यात आहे.

    थेट बँक खात्यात महिना १५०० रुपयांची ओवाळणी जमा करणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेने महाविकास आघाडीचा सारा खेळ खल्लास केल्याचे स्पष्ट चित्र आहे. या निवडणुकीत महिलांच्या मतदानात ७ टक्के वाढ झाली आणि हे बहिणींच्या मतांचे दान थेट महायुतीच्या पदरात पडले. बटेंगे तो कटेंगे, एक रहेंगे तो सेफ रहेंगे हा नारा देत महायुतीने दिलेली हिंदू एकजुटीची हाकदेखील राज्यभर मोठा परिणाम साधणारी ठरली.

    परिणामी, १४५ हा बहुमताचा जादुई आकडा मागे टाकत महायुतीने थेट २३५ जागांवर झेप घेत आपली सत्तेवरची पकड मजबूत केली. यात १३२ जागा जिंकत भारतीय जनता पक्षाने आजवरचा सर्वाधिक जागांचा उच्चांक नोंदवला. खालोखाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ५७, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ४१ आमदार निवडून आणले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सरपंच परिषदेच्या लढ्याला यश; ६ महिन्यांची प्रशासक म्हणून मुदतवाढ जाहीर

    February 21, 2026

    राजकीय वाद न्यायालयात; राहुल गांधींना पुन्हा जामीन

    February 21, 2026

    “मोठ्या लोकांचा पाठिंबा असल्यानेच धाडस?” : रोहित पवारांचा सवाल

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.